कल्याण-डोंबिवलीकरांचा पॅटर्न यशस्वी झाला, असा रोखला कोरोनाचा धोका

परिसरात कोरोना रुग्णांची संख्या आज कमी झाली असल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिले आहे.

कल्याण-डोंबिवलीकरांचा पॅटर्न यशस्वी झाला, असा रोखला कोरोनाचा धोका
Follow us
| Updated on: Nov 03, 2020 | 9:20 PM

ठाणे : कोरोनाचा प्रादूर्भाव सुरू झाला तेव्हा कल्याण डोंबिवलीत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या जास्त होती. पण यानंतर पहिल्या दिवसापासून कोरोनाचा धोका कमी करण्यासाठी महापालिका हद्दीत प्रयत्न केलं गेलं. यामुळे आता कल्याण डोंबिवलीकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. परिसरात कोरोना रुग्णांची संख्या आज कमी झाली असल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिले आहे. (Good news for Kalyan Dombivalikars number of Corona patients reduce)

मिळालेल्या माहितीनुसार, शहरात जीवघेणा कोरोना रोखण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष लक्ष दिले. तसेच आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि महापौर विनिता राणे यांच्यासह नगरसेवकांनी घेतलेल्या मेहनतीमुळे कोरोना रुग्णांची संख्या आज कमी झाली आहे असं खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं आहे.

एमएमआर रिजनमध्ये कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या जास्त होती. त्यामुळे कल्याण डोंबिवली महापालिका कोरोनाचा हॉटस्पॉट ठरली होती. केडीएमसीत आत्तार्पयत 50 हजार कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. आत्तार्पयत 10009 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

दिलासादायक बाब म्हणजे यामध्ये 47 हजार 945 रुग्ण बरे झाले आहे. केडीएमसीच्या रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94 टक्केपेक्षा जास्त आहे. केडीएमसीत कोरोना आल्यापासून पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार शिंदे यांनी विशेष लक्ष देऊन डॉक्टरांची मोठी टीम उभी केली. केडीएमसी आयुक्त विजय सूर्यवंशी आणि महापौर विनिता राणे यांनी वारंवार मेहनत घेऊन कोरोना योद्धा नर्सेस डॉक्टर यांना प्रोत्साहन दिले. त्याचाच परिमाण आहे की आज कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णाची संख्या कमी झाली आहे.

दिवसात नव्याने आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या 100 च्या आत आली आहे. यापूर्वी दिवसाला 600 पेक्षा जास्त नवे रुग्ण आढळून आले होते. कल्याण लोकसभेचे खासदार शिंदे एका सिसीटीव्ही कॅमेऱ्याच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी खासदार शिंदे यांनी सांगितले की, पहिल्या दिवसापासून सगळ्यांनी मेहनत घेतली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माझे कुटुंब माझी जबाबदारी ही संकल्पना राबविली गेली. घरोघरी जाऊन सव्रेक्षण केले गेले. त्यामुळे आज कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. याकडे त्यांनी लक्ष वेधले. खासदार श्रीकांत शिंदे सीसीटीव्ही कॅमेरेच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी कल्याण पूर्वेत आले होते.

इतर बातम्या – 

आशा स्वयंसेविकांची दिवाळी गोड होणार, 4 महिन्यांचा वाढीव मोबदला देण्यासाठी 57 कोटी वितरित : राजेश टोपे
चंद्रकांत पाटलांनी कोल्हापुरातून उभे राहावेच, आम्ही डिपॉझिट जप्त करुन दाखवू; राष्ट्रवादीचा दावा

(Good news for Kalyan Dombivalikars number of Corona patients reduce)

अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.