Good news for Nashik | नाशिकसाठी 346 कोटींचा वाढीव निधी मंजूर; उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा काय?

सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना 2022-23 मधून नाशिक जिल्ह्याला 414.73 कोटी रुपयांवरुन 500 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

Good news for Nashik | नाशिकसाठी 346 कोटींचा वाढीव निधी मंजूर; उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा काय?
राज्यस्तरीय बैठकीला उपमुख्यमंत्री अजितप पवार, पालकमंत्री छगन भुजबळ उपस्थित होते.
Follow us
| Updated on: Jan 22, 2022 | 9:23 AM

नाशिकः नाशिकसाठी एक अतिशय आनंदाची बातमी. 2022-23 साठी विभागाला 346 कोटींचा वाढीव निधी मंजूर केल्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली आहे. खरे तर जिल्हा वार्षिक योजनेसाठी एकूण 1 हजार 483  कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र, प्रत्येक जिल्ह्याची मागणी लक्षात घेता नाशिक विभागाला हा वाढीव निधी मंजूर केल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. उपमुख्यमंत्र्यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय बैठकीत ही घोषणा केली. मुंबई मंत्रालयातून या बैठकीत सहभागी झाले होते. यावेळी राज्याचे मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक येथून विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, उपायुक्त (नियोजन) प्रदीप पोतदार उपस्थित होते.

जिल्हानिहाय निधी असा

उपमुख्यमंत्री  तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार म्हणाले की, सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना 2022-23 मधून नाशिक जिल्ह्याला 414.73 कोटी रुपयांवरुन 500 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. अहमदनगर जिल्ह्याला 453.40 कोटी रुपयांवरुन 540 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. धुळे जिल्ह्याला 175.9 कोटी रुपयांवरुन 225 कोटी रुपयांचा निधी मंजूर आला आहे. जळगाव जिल्ह्याला 357.50 कोटी वरून 425 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला असून नंदूरबार जिल्ह्याला 82.69  कोटी वरुन 140 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जवळपास विभागाला 346 कोटी 59 लाख रुपयांचा वाढीव निधी देण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

जास्त निधीसाठी साकडे

विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेळेत निधी खर्च करण्यास थोड्या अडचणी आल्या असून जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची बैठक घेण्यात आली. शंभर टक्के निधी खर्चाचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती गमे यांनी यावेळी दिली. तसेच मागील दोन वर्षात विभागाच्यावतीने कोरोनासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च झालेला असल्याने विकास कामांसाठी निधीची कमतरता येत असून विकास कामांसाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी विनंती विभागाच्यावतीने गमे यांनी उपमुख्यमंत्री पवार यांना यावेळी केली.

सभागृहास निधी

विभागीय आयुक्त गमे यांनी स्व. यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्ष महोत्सव अंतर्गत नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या आवारात सभागृहाचे बांधकाम सुरू आहे. यासाठी 12 कोटी रुपयांचा निधी शासनस्तरावरून मंजूर झालेला आहे. हे काम अंतिम टप्प्यात असून, यासाठी 4.97 कोटी रुपयांचा वाढीव निधीची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली असून सदर वाढीव निधी देण्यास पवार यांनी मान्यता दिली आहे.

विभागाला 346 कोटींचा वाढीव निधी मंजूर केला आहे. जिल्हा वार्षिक योजनेसाठी एकूण 1 हजार 483  कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र, प्रत्येक जिल्ह्याची मागणी लक्षात घेता नाशिक विभागाला हा वाढीव निधी मंजूर केला आहे. – अजित पवार, उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री

मागील दोन वर्षात विभागाच्यावतीने कोरोनासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च झालेला असल्याने विकास कामांसाठी निधीची कमतरता येत असून विकास कामांसाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी विनंती विभागाच्यावतीने करण्यात आली आहे. – राधाकृष्ण गमे, विभागीय आयुक्त

इतर बातम्याः

Nashik Election: जानेवारीअखेरीस प्रारूप प्रभाग रचनेला लागणार मुहूर्त; कुठे रखडली प्रक्रिया?

Nashik | महापालिकेच्या आरोग्य विभागात 348 पदे भरणार, पण महापौरच अंधारात, प्रशासनाची खेळी काय?

Malegaon | 30 वर्षांपासून बंद असलेली खोली उघडली अन् मानवी कवटी, हाडे सापडली; मालेगावमध्ये खळबळ!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.