दुसऱ्याच्या बायकोच्या हातावर पोलीस अधिकाऱ्याचा टॅटू, महिलांच्या सुरक्षेवरून पडळकरांनी काढले वाभाडे
गोपीचंद पडळकरांनी (Gopichand Padalkar) विधान परिषदेत राज्याच्या पोलीस विभागाचे (Pune Police Crime) वाभाडे काढले आहेत. त्यांनी पुणे ग्रामीण पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.
मुंबई : महाविकास आणि भाजप ऐन अधिवेशनात (Assembly Session) आमनेसामने आले आहेत. त्यातच गोपीचंद पडळकरांनी (Gopichand Padalkar) विधान परिषदेत राज्याच्या पोलीस विभागाचे (Pune Police Crime) वाभाडे काढले आहेत. त्यांनी पुणे ग्रामीण पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. हे आरोप करताना एका पीएसआयवर पडळकरांनी हल्लाबोल चढवला आहे. त्याने पोलीस स्टेशनला आलेल्या महिलेला त्याच्या नवऱ्यापासून तोडल्याचा आरोप केला आहे. मोहीते नावाच्या पीएसआयने पोलीस स्टेशनल्या गेलेल्या महिलेचा नंबर घेतला. महिला बोलली मला एमपीएससी करायची आहे. हा म्हणाला मी तुला मार्गदर्शन करतो. तिने नवऱ्याचा नंबर न देता तिचा नंबर दिला. त्यानंतर चॅटिंग सुरू झालं. आणि त्यानंतर जे घडलं तेही पडळकरांनी सविस्तर सांगितलं आहे.
नेमका प्रकार काय घडाला?
ही काहणी सविस्तर सांगताना पडळकर म्हणाले, त्या बिचाऱ्या नवऱ्याला काहीच माहीत नाही. बायकोने आग्रह केला मला एमपीएससी करायची आहे. मला पुण्याला जायचे आहे. मला क्लास लावायचे आहेत. हीने आग्रह केल्यानंतर त्याला दोन मुली असताना म्हणाला तुला जायला परवानगी देतो. आपण पुण्याला जाऊ, महिला होस्टेल कुठे आहे बघू, तिथे तुझी सोय करू, तीने सांगितलं आता माझी सोय करायची गरज नाही. तिथे पीएसआय मोहीते आहेत. जे आता माझ्या ओळखीचे झाले आहेत. खूप चांगले आहेत. तिथे त्यांच्या पाहुण्याचे घर आहे. तिथे त्यांनी व्यवस्था केली आहे. काही दिवसांनंतर बायको नवऱ्याला फोन करायची बंद झाली. मग नवऱ्याच्या हा प्रकार लक्षात आला तेव्हा तो तिला भेटायला गेला. तेव्हा त्या पीएसआयच्या नवाचा टॅटू तिच्या शरिरावर गोदून घेतला होता, असा धक्कादायक प्रकार घडल्याचे पडळकरांनी सांगितले.
फोन केल्यावर नवऱ्याला धमकी
मग नवऱ्याने त्या पीएसआयला फोन केला की कशाला माझा संसार तोडत आहात. त्यावेळी तो पीएसआय काय बोलला याची ऑडिओ क्लिप मी सभापतींना दिली आहे. त्यात तो बोलतोय. तुझे हातपाय मोडेन तिला त्रास दिला तर, तुझी लायकी आहे का मला फोन करायची, माझ्या नादाला लागू नको. मी माझ्या कंपनीतला दहा टक्के शेअर तिच्या नावावर केलेत असा पीएसआय म्हणाला. मग त्याची कंपनी कुठली आहे? त्या पीएसआयचा सत्तार आता गृहमंत्र्यांनी करायला पाहिजे. कार्यालयात बसलेली महिला सुरक्षित आहे. मात्र पोलीस स्टेशनला गेलेली महिला पीएसआय घेऊन जातोय. आणि परत त्या नवऱ्याला धमकी देतोय तुझे हातपाय मोडीन, तू जर परत माझं नाव काढलं तर, असा प्रकार तिथे घडतोय. मात्र अजूनही त्या पीएसआयवर कोणतीही कारवाई नाही. गृहमंत्र्यांना त्याचं काही सोयरं सुतक नाही. त्याची माहिती ती ऑडिओ क्लिप सगळ्या सोशल मीडियावर आल्या, मात्र अजूनही त्यावर बोलण्याचे धाडस हे सरकार दाखवत नाही, यासारखे दुर्दैव नाही. ही सगळी प्रकरणे पुणे ग्रामीण एसपीच्या कानावर आहेत, असे गंभीर आरोप पोलिसांवर पडळकरांनी केले आहेत.