उस्मानाबादमध्ये कोरोना मृत्यूची लपवाछपवी, मृत्यूनंतर रुग्ण निगेटिव्ह, आक्षेपानंतर पुन्हा पॉझिटिव्ह

एकिकडे कोरोनाने थैमान घातले असताना उस्मानाबादमध्ये कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे आकडे लपवण्याचा खेळ समोर आलाय.

उस्मानाबादमध्ये कोरोना मृत्यूची लपवाछपवी, मृत्यूनंतर रुग्ण निगेटिव्ह, आक्षेपानंतर पुन्हा पॉझिटिव्ह
Follow us
| Updated on: Apr 16, 2021 | 9:38 PM

उस्मानाबाद : एकिकडे कोरोनाने थैमान घातले असताना उस्मानाबादमध्ये कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे आकडे लपवण्याचा खेळ समोर आलाय. नातेवाईकांच्या सतर्कतेमुळे हा डाव फसला. कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूनंतर तपासणीत त्याला कोरोना निगेटिव्ह दाखवण्यात आलं. मात्र, नातेवाईकांना आक्षेप घेतल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात संबंधित व्यक्ती पुन्हा कोरोनापॉझिटिव्ह निघाला. हा गंभीर प्रकार उघडकीस आल्यानंतर उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांना या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिलेत (Government hospital declared Corona patient negative after death in Osmanabad).

उस्मानाबाद तालुक्यातील बावी येथील अंगद कोंडीबा जाधव या 55 वर्षीय रुग्णाला 11 एप्रिल 2021 रोजी सायंकाळी साडेसात वाजता जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यावेळी त्यांना कोरोना झाल्याचं निष्पन्न झालं. एचआरसीटीमध्ये त्यांचा स्कोर 25 पैकी 23 आला. त्यामुळे त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार करण्यात आले.

“मृत्यूनंतर नातेवाईकांना कोरोना बाधित रुग्णाचा मृतदेह नेण्यास सांगितलं”

शुक्रवारी (16 एप्रिल) सकाळी अंगद जाधव यांचे निधन झाले. निधन झाल्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात 16 एप्रिल 2021 रोजी सकाळी 10.03 वाजता जाधव यांच्या मृतदेहाची रॅपिड अँटीजन तपासणी करण्यात आली. त्यावेळी ती निगेटिव्ह आली असे दाखवण्यात आले आणि नातेवाईकांना मृतदेह नेण्यास सांगण्यात आले. त्यावेळी नातेवाईकांनी आक्षेप घेत अनेक खोचक प्रश्न विचारले. कुटुंबीयांना शंका आल्यानंतर त्यांनी रुग्णालयाला पुन्हा मृतदेहाची तपासणी करण्यास सांगितले. त्यानंतर सकाळी 10.38 वाजता पुन्हा मृतदेहाची रॅपिड अँटिजन चाचणी करण्यात आली. त्यावेळी ती अवघ्या अर्ध्या तासात पॉझिटिव्ह आली.

नातेवाईकांनी आक्षेप घेताच अवघ्या अर्ध्या तासात पुन्हा मृत व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह

उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयातील केस पेपर टीव्ही 9 मराठीच्या हाती लागले आहेत. यातूनही हा सर्व लपवाछपवीचा प्रकार उघड झालाय. यानंतर जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी चौकशीचे आदेश दिलेत. नातेवाईकांनी आक्षेप घेताच अवघ्या अर्ध्या तासात पुन्हा मृत व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातंय.

हेही वाचा :

VIDEO : एकाच वेळी 23 जणांचा अंत्यसंस्कार, अंतिम दर्शनासाठी नातेवाईकांची पायपीट, उस्मानाबादेत मनाला चटका लावणारं दृश्य

Photo : उस्मानाबादमधील मृतदेहांची रांग हटेना, काल एकाचवेळी 19 अंत्यसंस्कार, तर आज एकाचवेळी 15 जणांना अग्नी

Special Report | उस्मानाबादच्या शासकीय रुग्णालयाची स्थिती गंभीर, एकाच बेडवर दोन-दोन रुग्णांवर उपचार

व्हिडीओ पाहा :

Government hospital declared Corona patient negative after death in Osmanabad

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.