गावा-खेड्यात उडणार प्रचाराचा धुराळा, असा आहे निवडणूक कार्यक्रम…

जिल्ह्यातील १९४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकीची अधिसूचना मंगळवारी अधिसूचना जाहीर होईल तहसिल स्तरावर ही सूचना प्रसिद्ध केली जाणार आहे.

गावा-खेड्यात उडणार प्रचाराचा धुराळा, असा आहे निवडणूक कार्यक्रम...
Image Credit source: FACEBOOK
Follow us
| Updated on: Sep 12, 2022 | 8:44 PM

नाशिक : नाशिक जिल्हयातील (Nashikdistrict) १९४ ग्रामपंचायत निवडणुकीची मंगळवारी अधिसूचना जाहीर होणार असल्याने गावपातळीवर प्रचाराचा धुराळा उडणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विविध कारणावरून निवडणुका (Election) पुढे ढकलल्या जात होत्या. त्यामुळे निवडणुका कधी होणार अशी गावा-खेड्यात सुरू असलेली चर्चा अखेर थांबणार आहे. जिल्ह्यातील चार तालुक्यातील निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. १९४ ग्रामपंचायतीची (Grampanchayat) निवडणूक प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता गावागावात राजकीय वातावरण तापणार असून प्रचाराचा धुराळा उडणार आहे.

जिल्ह्यातील १९४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकीची अधिसूचना मंगळवारी अधिसूचना जाहीर होईल तहसिल स्तरावर ही सूचना प्रसिद्ध केली जाईल.

जिल्ह्यात यापूर्वीच ८८ ग्रामपंचायतींमध्ये प्रचाराचा फड एैन रंगात आलाय आणि आता नव्याने ०४ तालूक्यांमध्ये निवडणूकीचा रणधुमाळीला सुरुवात होणार आहे.

हे सुद्धा वाचा

आयोगाने राज्यातील ८२ तालूक्यांमधील मुदत संपलेल्या आणि संपणार्‍या १ हजार १६६ ग्राम पंचायतींच्या निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे.

त्यामध्ये जिल्ह्यातील इगतपूरी, त्र्यंबकेश्वर, पेठ व सुरगाणा या चार तालूक्यांमधील १९४ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

२१ ते २७ सप्टेंबर या कालावधीत इच्छुकांना नामनिर्देशन पत्र सादर करता येतील. २८ तारखेला दाखल अर्जांची छाननी होईल.

३० तारखेला दुपारी ३ पर्यंत माघारी व त्यानंतर लगेचच रिंगणातील अंतिम उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वितरण करण्यात येणार आहे.

त्यानंतर १३ ऑक्टोबरला मतदान व १४ ला मतमोजणी आणि १९ ऑक्टोबरला निकालीची अंतिम अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल.

निवडणूका होत असलेल्या ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात यापूर्वीच आचारसंहिता लागू झाली आहे.

स्थानिक पातळीवर आता निवडणूक अधिसूचना प्रसिद्ध होणार असल्याने गावा-गावांमध्ये राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.

Non Stop LIVE Update
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा.
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्...
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्....
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात..
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात...
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.