शेतकऱ्यांना मोठा दिलासा, माथाडी कामगारांचा संप मागे; पिंपळगाव बसवंतमधील कांदा लिलाव उद्यापासून सुरू

शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी बातमी. अखेर पिंपळगाव बसवंत येथे सुरू असलेला संप माथाडी कामगारांनी गुरुवारी मागे घेतल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत उद्या शुक्रवारपासून कांद्याचे लिलाव पूर्ववत सुरू होणार आहेत.

शेतकऱ्यांना मोठा दिलासा, माथाडी कामगारांचा संप मागे; पिंपळगाव बसवंतमधील कांदा लिलाव उद्यापासून सुरू
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Nov 11, 2021 | 2:47 PM

लासलगावः शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी बातमी. अखेर पिंपळगाव बसवंत येथे सुरू असलेला संप माथाडी कामगारांनी गुरुवारी मागे घेतल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत उद्या शुक्रवारपासून कांद्याचे लिलाव पूर्ववत सुरू होणार आहेत.

पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा व्यापाऱ्यांकडे कांद्याच्या गोदामावर काम करणाऱ्या टोळी दोनच्या माथाडी कामगारांनी मंगळवारी अचानक संप पुकारला होता. त्यामुळे व्यापाऱ्यांनी पुढील सूचना मिळेपर्यंत कांदा लिलाव बंद राहणार असल्याची घोषणा केली. ऐन दिवाळीनंतर हे आंदोलन सुरू झाले. खरे तर दिवाळी आणि साप्ताहिक सुट्ट्या मिळून नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या अगोदरच दहा दिवस बंद होत्या. त्यानंतर हे आंदोलन सुरू झाल्याने शेतकऱ्यांची चांगलीच कोंडी झाली. मात्र, या आंदोलनावर तोडगा निघत नव्हता. शेवटी नाशिक येथे कामगार आयुक्तांनी तातडीने दखल घेत कांदा व्यापारी आणि टोळी क्रमांक दोनच्या माथाडी कामगारांची बैठक घडवून आणली. या बैठकीत कामगांरांच्या विविध मागण्यांवर तोडगा काढण्यात आला. त्यामुळे संपावर गेलेल्या जवळपास साडेतीनशे माथाडी कामगारांनी कामावर येणार असल्याची घोषणा केली आहे. त्यानंतर पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीनेही उद्या शुक्रवारपासून कांद्याचे लिलाव सुरळीत सुरू होतील, अशी माहिती दिली. या आंदोलनाचा तिढा सुटल्याने कांद्याच्या लिलावाच्या प्रतीक्षेत असलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

लासलगावमध्ये उन्हाळी कांद्याची आवक

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या उन्हाळी आणि लाल कांद्याची आवक सुरू झाली आहे. गुरुवारी अंदाजे 8250 क्विंटल कांद्याची आवक झाली. तर 100 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली आहे. त्यात उन्हाळी कांद्याचे गुरुवारी किमान भाव क्विंटलमागे 1100 कमाल 3200 सर्वसाधारण 2650 नोंदवले गेले. लाल कांद्याचे किमान दर हे 1212 , कमाल दर 2900 रुपये आणि सर्वसाधरण दर 2500 रुपये नोंदवले गेले. येणाऱ्या काळ्यात कांद्याची आवक वाढू शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

लालसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील आजची कांदा आवक

उन्हाळ कांदा – आवक अंदाजे 8250 क्विंटल (725 नग) लाल कांदा – आवक अंदाजे 100 क्विंटल (5 नग)

लासलगावमधील आजचे बाजारभाव (प्रति क्विंटल रुपयांमध्ये) (किमान-कमाल-सर्वसाधारण)

उन्हाळी कांदा – 100 – 3200 – 2650 लाल कांदा – 1212 – 2900 – 2500 मका – 1421 – 1722 – 1660 सोयाबीन – 3000 – 5840 – 5660 गहू – 1911 – 2300- 1951 बाजरी – 1500 – 1852 – 1551 हरभरा – 4100 – 5011 – 4500 मूग – 4801 – 7172 – 6700

टोमॅटो बाजारभाव (क्रेटस प्रमाणे)

(किमान-कमाल-सर्वसाधारण) टोमॅटो – 0100 – 0600 – 0525

(Great relief to the farmers, behind the strike of Mathadi workers; Onion auction in Pimpalgaon Baswant Agricultural Produce Market Committee will start from tomorrow)

इतर बातम्याः

कांदा करणार वांदा, आयातीला शेतकरी संघटनेचा विरोध; व्यापारी-आडत्यांना धडा शिकवण्याचा इशारा

Good News: रब्बीच्या पेरणीसाठी नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मिळणार अनुदानावर बियाणे

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.