Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्तेंचा ताबा कोल्हापूर पोलीसांकडे, मराठा समाजाबद्दलचं वक्तव्य भोवलं
गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा आता साताऱ्यानंतर कोल्हापूर पोलिसांकडे जाण्याची दाट शक्यता आहे. कोल्हापूर पोलिसांनी गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा मागितला आहे. तशी मागणी त्यांनी कोर्टात केली होती.
मुंबई : गुणरत्न सदावर्ते (gunratna sadavarte) यांचा ताबा आता साताऱ्यानंतर (Satara) कोल्हापूर पोलिसांकडे (Kolhapur Police) जाण्याची दाट शक्यता आहे. कोल्हापूर पोलिसांनी गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा मागितला आहे. तशी मागणी त्यांनी कोर्टात केली होती. दरम्यान, सातारा पोलिसांच्या ताब्यात असलेल्या गुणरत्न सदावर्ते यांना एककीडे दिलासा मिळाला होता. मात्र आता साताऱ्यानंतर त्यांची रवानगी कोल्हापुरात होते की काय, अशी शक्यता निर्माण झाली आहे. साताऱ्यात सदावर्तेंविरोधात गुन्हा दाखल झाला होता. मराठा आरक्षणाच्या आंदोलनदरम्यान आक्षेपार्ह विधानामुळे त्यांच्याविरोधात पोलिसात तक्रार देण्यात आली. त्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. साताऱ्यात दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर राज्यात वेगवेगळ्या भागात सदावर्तेविरोधात गुन्हा दाखल झाला. कोल्हापुरातही सदावर्तेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मराठा आरक्षणादरम्यान केलेल्या वक्तव्याविरोधातच हा गुन्हा कोल्हापुरातही एका व्यक्तीनं दाखल केला. त्यानंतर आता कोल्हापूर पोलिसांनी सदावर्तेंचा ताबा मिळावा, अशी मागणी केली होती.
कोल्हापूर पोलिसांना का ताबा मिळणार?
सातारा पोलिसांच्या ताब्यात असलेले गणरत्न सदावर्ते यांना दिलासा मिळाला आहे. सातारा सत्र न्यायालयानं त्यांचा जामीन अर्ज मंजूर केलाय. त्यामुळे सातारा पोलिसांना आता गुणरत्न सदावर्तेंचा ताबा घेता येणार नाही. तर दुसरीकडे गिरगाव कोर्टानं सदावर्ते यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता गुणरत्न सदावर्तेंचा ताबा मुंबई, सातारा यानंतर कोल्हापूर पोलिसांकडे जाईल, असं सांगितलं जातंय. मराठा आरक्षणाच्या आंदोलनदरम्यान आक्षेपार्ह विधानामुळे त्यांच्याविरोधात पोलिसात तक्रार देण्यात आली. आधी सातारा त्या नंतर कोल्हापुरात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 18 एप्रिलला सातारा न्यायालायनं गुणरत्न सदावर्ते यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर त्यांना अर्थर रोड कारागृहात आणण्यात आलं.दरम्यान, एकीकडे गिरगाव पोलिसांनी सदावर्तेंनी चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर दुसरीकडे सातारा सत्र न्यायालयानं त्यांचा जामीन अर्ज मंजूर केलाय.त्यामुळे आता गुणरत्न सदावर्तेंचा ताबा मुंबई, सातारा यानंतर कोल्हापूर पोलिसांकडे जाईल,असं सांगितलं जातंय.
सातारा सत्र न्यायालयाकडून जामीन अर्ज मंजूर
एकीकडे गिरगाव पोलिसांनी सदावर्तेंनी चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर दुसरीकडे सातारा सत्र न्यायालयानं त्यांचा जामीन अर्ज मंजूर केलाय. कोल्हापूर पोलिसांनी गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा मागितला आहे. तशी मागणी त्यांनी कोर्टात केली होती. दरम्यान, सातारा पोलिसांच्या ताब्यात असलेल्या गुणरत्न सदावर्ते यांना एककीडे दिलासा मिळाला होता. मात्र आता साताऱ्यानंतर त्यांची रवानगी कोल्हापुरात होते की काय, अशी शक्यता निर्माण झाली आहे.
इतर बातम्या
Pune MNS meeting : राज ठाकरेंचा आदेश आमच्यासाठी महत्त्वाचा; पुण्यात मनसेची भूमिका, आज बैठक
VIDEO : Solapur मध्ये Gunratan Sadavarte यांच्याविरोधात गुन्हा दाखल