अर्ध्या मंत्रिमंडळाला वाटते मराठा नको, अर्ध्या मंत्रिमंडळाला वाटते ओबीसी नको; भाजप नेते गिरीश महाजन यांचा सरकारवर हल्लाबोल

अर्ध्या मंत्रिमंडळाला वाटते मराठा नको, अर्ध्या मंत्रिमंडळाला वाटते ओबीसी नको, असा थेट आरोप करत भाजप नेते गिरीश महाजन यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ते नाशिकमध्ये आले असता बोलत होते.

अर्ध्या मंत्रिमंडळाला वाटते मराठा नको, अर्ध्या मंत्रिमंडळाला वाटते ओबीसी नको; भाजप नेते गिरीश महाजन यांचा सरकारवर हल्लाबोल
गिरीश महाजन, भाजप नेते.
Follow us
| Updated on: Oct 10, 2021 | 5:47 PM

नाशिकः अर्ध्या मंत्रिमंडळाला वाटते मराठा नको, अर्ध्या मंत्रिमंडळाला वाटते ओबीसी नको, असा थेट आरोप करत भाजप नेते गिरीश महाजन यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ते नाशिकमध्ये आले असता बोलत होते.

महाजन यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकावर चौफेर टीका केली. ते म्हणाले, राज्य सरकारने ओबीसी समाजावर खूप मोठा अन्याय केला आहे. तांत्रिक बाबी पूर्ण केल्या नाहीत. त्याचा फटका या समाजाला बसला. सरकार तुमचे असताना ही वेळ का. अर्ध्या मंत्रिमंडळाला वाटते मराठाला नको आणि अर्ध्या मंत्रिमंडळाला वाटते ओबीसीला नको. त्यामुळेच ओबीसी अभियान हाती घेतल्याचा दावा त्यांनी केला. शेतकरी प्रश्नांवरूनही त्यांनी सरकारवर टीका केली. ते म्हणाले, पवार साहेब ज्येष्ठ नेते असून राज्यातल्या शेतकऱ्यांवर अन्याय होतो आहे. अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातला शेतकरी संकटात आहे. अजून सरकारने कोणालाच मदत केली नाही. साधी एक दमडी फेकली नाही. त्यामुळे शेतकरी संपुष्टात येत असल्याचे ते म्हणाले.

राजकीय बंदला साथ नाही

उत्तर प्रदेशच्या घटनेमुळे महाराष्ट्र बंद म्हणायचे. हा राजकीय हेतूने घेतलेला निर्णय आहे. आधीच कोरोनामुळे व्यापारी त्रस्त आहेत. अशावेळी महाराष्ट्र बंदच्या राजकीय हाकेला कोणी साथ देणार नाही. शरद पवार उत्तर प्रदेशच्या घटनेबद्दल बोलले आणि धाडी सुरू झाल्या, असे काहीही नाही. ते स्वतः म्हणाले आहेत की, पाहुणे जाऊ द्या म्हणून. त्यामुळे अजित पवारांच्या धाडीसंदर्भात जे काही असेल, ते समोर येईलच. ड्रग्सच्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेसने एवढा पुढाकार घेतला आहे. आजची तरुण पिढी जागृत होत आहे. त्यातही राजकारण आणणे चुकीचे आहे. शेतकरी किंवा इतर कुठलाही मुद्दा असो त्यात राजकारण आणायचे हे या सरकारने ठरवलेले दिसते, असा आरोपही त्यांनी केला.

खडसे काठावर निवडून येत

गिरीश महाजनांनी खडसेंवर टीका केली. ते म्हणाले, खडसे यांच्या पाठीशी खूप बहुमत होते असे काही नव्हते. पूर्वीपासून ते काठावर निवडून येत होते. कोणाला दोष देऊन उपयोग नाही. कधी म्हणता फडणवीसांमुळे पडलो, कधी म्हणता माझ्यामुळे. दोन वर्षानंतर त्यांना कळलं मी त्यांना पाडले म्हणून, असा चिमटाही त्यांनी काढला. राज्यातील अनेक सहकारी बँका डबघाईला आल्या आहेत. जळगाव जिल्हा बँकेत शेतकऱ्यांसाठी आम्ही एकत्र आलो. ही निवडणूक बिनविरोध करू, असेही ते म्हणाले. जळगावमध्ये अनेक नगरसेवक पुन्हा परत यायचं म्हणत आहेत. १७ ते १८ जण संपर्कात आहेत. मात्र, अजून विचार केलेला नाही, असा दावाही त्यांनी केला.

इतर बातम्याः

नाशिकमध्ये बँक मॅनेजरने 14 लाख हडपले; ग्राहकाची पंचवटी पोलिस ठाण्यात धाव, गुन्हा दाखल

अन्यथा पुन्हा लॉकडाऊन, पालकमंत्री भुजबळांचा नाशिककरांना इशारा; खराब रस्त्यांचा प्रश्न कॅबिनेटमध्ये मांडणार

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.