शिंदे गटाने दिल्या ठाकरे गटाला शुभेच्छा, जुन्या मैत्रीनिमित्त संपर्क की मोठी राजकीय खेळी…
शिंदे गटात असलेले मंत्री, आमदार आणि खासदार यांच्याकडून जुन्या सहकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या जात आहे, त्यात शिंदे गटाकडे खेचण्याचा प्रयत्न एकूणच केला असावा.
Nashik Political News : शिवसेनेत (Shivsena) उभी फुट पडल्यानंतर राज्यात सत्तांतर झाले आहेत. शिंदे आणि ठाकरे असे दोन गट पडले आहे. त्यानुसार दोन्ही गट आपआपली ताकद वाढविण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहेत. मात्र, याच काळात शिंदे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा (Diwali) देत चाचपणी केल्याची माहिती समोर येत आहे. दिवाळीच्या निमित्ताने शुभेच्छा देतांना जुन्या मैत्रीचा संदर्भ देत असल्याचे सांगितले जात असले तरी यामागे राजकीय खेळी असल्याचे बोलले जात आहे. नाशिकमधील राजकीय परिस्थिति पाहता शिंदे गटात मंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे आणि खासदार हेमंत गोडसे यांच्या व्यतिरिक्त फारसा कोणीही मोठा नेता शिंदे गटात गेला नाही. परंतु दिवाळीच्या निमित्ताने शुभेच्छा देत असतांना ठाकरे गटाच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांची चाचपणी केल्याचे दिसून येत आहे.
जून महिन्यात राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला, त्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळून भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले.
सत्तांतर होत असतांना एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडली, त्यानुसार शिंदे गटाकडे ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी देखील जात आहे.
मात्र, याच काळात नाशिकमध्ये पदाधिकारी, कार्यकर्ते यांची प्रवेशाची संख्या फार कमी होती, त्यामुळे दिवाळीची संधी जात असल्याची चर्चा आहे.
शिंदे गटात असलेले मंत्री, आमदार आणि खासदार यांच्याकडून जुन्या सहकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या जात आहे, त्यात शिंदे गटाकडे खेचण्याचा प्रयत्न एकूणच केला असावा.
शिंदे गटाकडून नाशिकच्या ठाकरे गटाच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत, त्यात चाचपणी केली जात असून यामागे मोठी राजकीय खेळी असल्याची चर्चा आहे.