Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रावसाहेब दानवेंमुळे आत्महत्या करण्याची वेळ, हर्षवर्धन जाधवांचा सासऱ्यांवर गंभीर आरोप

कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि त्यांचे सासरे भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्यातील वाद (Harshvardhan Jadhav Allegations on Raosaheb Danve) पुन्हा एकदा उफाळून आला आहे

रावसाहेब दानवेंमुळे आत्महत्या करण्याची वेळ, हर्षवर्धन जाधवांचा सासऱ्यांवर गंभीर आरोप
Follow us
| Updated on: May 30, 2020 | 12:27 PM

औरंगाबाद : कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि त्यांचे सासरे भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्यातील वाद (Harshvardhan Jadhav Allegations on Raosaheb Danve) पुन्हा एकदा उफाळून आला आहे. हर्षवर्धन जाधव यांनी यूट्यूबवर व्हिडीओ अपलोड करुन रावसाहेब दानवे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. याशिवाय हर्षवर्धन जाधव यांनी रावसाहेब दानवे यांना त्यांचे अनेक आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करण्याचा इशारा दिला आहे.

“रावसाहेब दानवे यांच्यामुळे माझ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली. त्यांनी माझ्याविरोधात अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करायला लावला. त्यांच्या त्रासामुळे मी अंतूर किल्ल्यावर आत्महत्या करण्यासाठी गेलो होतो”, असे गंभीर आरोप हर्षवर्धन जाधव यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर केले आहेत (Harshvardhan Jadhav Allegations on Raosaheb Danve).

“तुम्हाला असं वाटतं की, हा खूप फडफड करतो. याला कुठेही धरु आणि कापून टाकू. तुमचे छक्के-पंजे असलेले सगळे व्हिडीओ मी काढले आहेत. मी ते व्हिडीओ वकिलांना पाठवले आहेत. तुम्ही काहीही वेडंवाकडं केलं तर मी जीव देवून टाकेन आणि तुमचे व्हिडीओ व्हायरल होतील. त्यामुळे तुम्हीपण जगा आणि मलाही जगू द्या”, असा इशारा हर्षवर्धन जाधव यांनी दिला.

“मी विनम्रपणे विनंती करतो माझा पिच्छा सोडा. तुमच्या मुलीला मी माझा बंगला द्यायला तयार आहे. मी फक्त प्लॉट देणार नाही. कारण तो प्लॉट माझ्या आई-वडिलांचा आहे. तुम्ही तिथे निळे, पिवळे झेंडे लावणार आणि तमाशा करणार, हे मला माहिती आहे”, अशी टीका हर्षवर्धन जाधव यांनी केली.

“आता मला त्रास देऊ नका. तुम्ही कुठेही पोलीस पाठवले, मला अडकवायचा प्रयत्न केला तर सायनाईटच्या गोळ्या घेऊन जीव देईन. मी जीव दिल्यानंतर तुमचं रेकॉर्डिंग व्हायरल होईल. ते व्हायरल झालं तर तुमची पंचायत होईल. त्यामुळे कृपा करुन जगा आणि जगू द्या”, असं हर्षनवर्धन जाधव म्हणाले.

“पत्नी संजनाला जेव्हा माझी मदत लागेल तेव्हा मी तिला मदत करण्यासाठी येईन. पण आता मी संजनासोबत संसार करु शकत नाही. तुम्ही माझा खून केला तरी चालेल. पकडून मारलं, तरी चालेल. कारण तुम्ही तेच करु शकता. गुंडगिरीच्या पलिकडे तुम्हाला काही येतच नाही”, अशी टीका हर्षवर्धन जाधव यांनी केली आहे.

कोण आहेत हर्षवर्धन ?

  • हर्षवर्धन जाधव हे भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत.
  • हर्षवर्धन जाधव हे 2009 मध्ये मनसेच्या तिकिटावर कन्नड विधानसभा निवडणुकीत निवडून आले होते.
  • मात्र पाच वर्षांच्या आत त्यांनी पक्षांतर्गत मतभेदामुळे मनसेला सोडचिठ्ठी दिली होती.
  • त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
  • 2019 च्या लोकसभा निवडणुकीत हर्षवर्धन जाधव यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. मात्र त्यांचा पराभव झाला.
  • 2019 च्या विधानसभा निवडणुकीतही हर्षवर्धन जाधव यांना विजय मिळवता आला नाही.
  • शिवसेनेच्या उदयसिंग राजपूत यांनी त्यांचा पराभव केला.

संबंधित बातम्या :

संजनाकडून प्रश्न सोडवून घ्या, हर्षवर्धन जाधव यांचा राजकारणाला रामराम, उत्तराधिकारीही जाहीर

सोलापूरचे धडाकेबाज पालकमंत्री, थेट कोरोना वॉर्डात जाऊन रुग्णांची विचारपूस, स्वत: स्वच्छतागृहांची पाहणी, नर्स- डॉक्टर्सची पाठ थोपटली

साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर.
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी.
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.