17 डॉक्टर देखील शोधू शकले नाहीत, असला विचित्र आजार, त्याला जग पिकासो पेटींगप्रमाणं दिसायचं
मुंबईतील एका 64 वर्षीय व्यक्तीला सहा महिन्यांपर्यंत असं वाटत होतं की तो पिकासोच्या पेंटिंगमध्ये राहतोय, जेथे प्रत्येक चेहरा आणि वस्तू विचित्र आणि विकृत दिसताहेत काय आहे हा विचित्र आजार
कोणाला कसला आजार होईल याचा काही नेम नाही. मुंबईतील एका व्यक्तीला सहा महिने सभोवतालचं जग एका पेटींग प्रमाणे दिसायचं. प्रत्येक चेहरा आणि वस्तू चित्रविचित्र दिसायची.या दुर्दैवी स्थितीने त्यांचे जीवन भयानक बनले होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सतरा डॉक्टर देखील त्यांच्या आजाराचा पत्ता लावू शकले नाहीत. काय होता हा विचित्र आजार ? ज्यात माणसाला सभोवतालचं जग देखील नीट दिसायचं नाही. एखाद्या अमूर्त चित्रकले सारखे जग दिसायचं ?
रुग्णांना चित्र विचित्र आजार होत असतात. अनेकांना शारीरिक आणि मानसिक आजार होता. एका व्यक्तीला चांगली झोप येत नव्हती. त्याअला चित्रविचित्र आणि घाबरवणाऱ्या स्थितीचा सामना करावा लागत होता. पुणे स्थित सह्याद्री हॉस्पिटलमध्ये न्युरोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ.एन.आर. इचापोरिया यांनी सांगितले की, ‘एक व्यक्ती माझ्या क्लिनिकमध्ये आला होता. त्याची तपासणी केली तेव्हा त्याला थोडा हलका ब्लडप्रेशर होते. त्याचा पायात थोडी हालचाल आणि अधून मधून झटके येत होते. परंतू त्याची सगळ्यात विचित्र तक्रार होती की त्याला सर्व काही चित्र विचित्र आणि भयानक दिसत होते.’ त्याच्या असमान्य तक्रारीमुळे त्याला डॉ.एन.आर. इचापोरिया यांनी सभोवतालचं जग कसे दिसते याचे चित्र काढायला सांगितलं. त्याने काढलेले चित्र पिकासोच्या एखाद्या पेटिंग प्रमाणे होते. त्यामुळे त्याच्या मानसिक स्थितीचा अंदाज आला. त्यानंतर त्याच्या अनेक चाचण्या केल्या गेल्या. त्याला एक दुर्लभ ऑटोइम्युन आजार असल्याचे समजले. चाचण्यात CASPR2 एंटीबॉडी असल्याचे समजले. ज्यामुळे ऑटोइम्युन इंसेफेलाइटीस झाला होता.
काय आहे का दुर्लभ आजार
या दुर्लभ आजाराने त्याच्या नर्व्हस सिस्टीमवर हल्ला होत होता. त्यामुळे त्याची दृष्टी आणि मेंदूत त्रास निर्माण होत होता. आम्ही तात्काळ उपचार सरु केले. त्याला इम्यूनोग्लोबुलिन आणि स्टिरॉईड दिले गेले. काही महिने त्याला बरे वाटले. पुन्हा नवीन लक्षणे दिसू लागली.शेवटी योग्य उपचाराने दुसऱ्यादा त्याला बरे केले गेले. या स्थितीत समजले की ऑटोइम्यून या आजाराची ओळखण्यात सावधानता आणि आधुनिक तंत्राचा वापर करणे किती महत्वाचे आहे.