आरोग्य विभागाची गट क आणि ड वर्गाची परीक्षा पुढे ढकलली! आता परीक्षेची तारीख काय?
आरोग्य विभागात होणारी गट क आणि ड वर्गाची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. 8 आणि 9 सप्टेंबरला ही परीक्षा होणार होती. मात्र, परीक्षेचं कंत्राट दिलेल्या कंपनीच्या गोंधळामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. एकूण 6 हजार 185 पदांसाठी ही भरती परीक्षा होणार होती. त्याऐवजी आता 25 सप्टेंबर गट क आणि 26 सप्टेंबरला गट ड संवर्गाची परीक्षा होणार असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
पुणे : राज्य सरकारच्या आरोग्य विभागात होणारी गट क आणि ड वर्गाची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. 8 आणि 9 सप्टेंबरला ही परीक्षा होणार होती. मात्र, परीक्षेचं कंत्राट दिलेल्या कंपनीच्या गोंधळामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. एकूण 6 हजार 185 पदांसाठी ही भरती परीक्षा होणार होती. त्याऐवजी आता 25 सप्टेंबर गट क आणि 26 सप्टेंबरला गट ड संवर्गाची परीक्षा होणार असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. कंत्राट दिलेल्या कंपनीनं गोंधळ टाळावा अशी अपेक्षा या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. तर परीक्षेचं चोख नियोजन करण्यासाठी राज्य आरोग्य विभागाच्या कंपनीला सूचना देण्यात आल्या आहेत. (Group C and D examinations in the health department were postponed)
वैद्यकीय शिक्षण विभागातही लवकरच भरती
राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागात लवकरच 15 ते 20 हजार पदांची भरती करण्यात येणार आहे. विविध वर्गवारीतील ही पदांची भरती असणार आहे. यासाठी मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली असून लवकरच ही भरती प्रक्रिया पार पडेल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी 27 मे रोजी दिली होती. ते लातूर इथे बोलत होते. विशेष म्हणजे कोरोना काळात सलग सेवा देणाऱ्या डॉक्टरांना सामावून घेण्यासाठी देखील सरकार सकारात्मक असल्याचंही देशमुख यांनी सांगितले आहे.
“कोरोना काळात आरोग्य यंत्रणेवर मोठी जबाबदारी होती. मात्र, काही ठिकाणी कर्मचाऱ्यांची कमी जाणवत होती. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण येत होता. आरोग्य यंत्रणेवरील ताण लक्षात घेता राज्याच्या आरोग्य विभागात 17 हजार पदांची भरती होणार आहे. यापैकी 8 हजार 500 पदांची भरती निघणार आहे”, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी 17 जानेवारी 2021 रोजी दिली होती.
कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार?
दरम्यान, कोरोना संकट काळात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे नोकरीचे कंत्राट संपले असले तरी त्यांना आगामी काळात आणि इतर नोकर भरती वेळी सामावून घेण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यासाठी नोकर भरती प्रक्रियेत बदल करण्याचा सरकारचा विचार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी 17 जानेवारी रोजी दिली होती. कोरोना काळात कंत्राटी पद्धतीने काम केलेल्या आरोग्य कर्मचारी यांना कोरोना संकट कमी झाल्याने नोकरीतून काढून टाकले होते. त्यामुळे या लोकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली होती. मात्र या कर्मचाऱ्यांना नोकर भरतीत प्राधान्य दिले जाणार असल्याने त्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
कोणत्या पदांसाठी भरती होण्याची शक्यता ?
सामाजिक अधीक्षक (भौतिकशास्त्र), फिजिओथेरपिस्ट, समुपदेशक, व्यावसायिक थेरपिस्ट, ज्युनियर लिपिक, सामाजिक अधीक्षक (वैद्यकीय), प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, नेत्र चिकित्सा अधिकारी, नॉन वैद्यकीय सहाय्यक, सांख्यिकीय अन्वेषक, रासायनिक सहाय्यक, बॅक्टेरियोलॉजिकल असिस्टंट, ज्युनियर अभियंता, मीडिया मेकर, टेलिफोन ऑपरेटर, इलेक्ट्रिशियन, कुशल कारागीर, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, जेआर तांत्रिक सहाय्यक, तंत्रज्ञ, फोरमॅन, सेवा अभियंता, वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक, शिक्षक, सार्वजनिक आरोग्य परिचारिका, बालरोग परिचारिका, ग्रुहा वस्त्रपाल, लॅब टेक अधिकारी, लॅब वैज्ञानिक अधिकारी, लॅब सहाय्यक, एक्स -रे टेक्निशियन. ब्लड बँक वैज्ञानिक अधिकारी, फार्मासिस्ट अधिकारी, डाएटिशियन, स्टाफ नर्स, ड्रायव्हर, प्लंबर, अभिलेखपाल, ज्युनियर क्लर्क, इलेक्ट्रीशियन, एएनएम, सीनियर क्लार्क, लॅब टेक्निशियन, एक्स-रे तंत्रज्ञ, रक्तपेढी तंत्रज्ञ, फार्मसी अधिकारी, ईसीजी टेक्निशियन, टेलर , रेकॉर्ड कीपर, हाऊस अँड लिनेन कीपर, स्टोअर व लिनन कीपर, एक्स-रे वैज्ञानिक अधिकारी, रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी, डायलिसिस टेक्निशियन, शिंपी, नलकरगिरी, सुतार, डेंटल हायजीनिस्ट, वॉर्डन, अबलेखापाल, सुतार, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, टेलर, ईसीजी तंत्रज्ञ.
इतर बातम्या :
Group C and D examinations in the health department were postponed