खोट्या टेस्टिंग किट्स देणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करू, राजेश टोपेंचा इशारा

या कंपन्यांच्या टेस्टिंग किट्स वापरु नये, असे स्पष्ट निर्देश राजेश टोपे यांनी दिले आहे.   (Health Minister Rajesh Tope On Corona Fake Testing Kit)

खोट्या टेस्टिंग किट्स देणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करू, राजेश टोपेंचा इशारा
Follow us
| Updated on: Oct 13, 2020 | 8:48 AM

जालना : जीसीसी या कंपनीच्या टेस्टिंग किट महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यात दिल्या असतील, त्याबाबत एनआयव्हीचा रिपोर्ट मागितला आहे. तसेच ज्या कंपन्या खोट्या किट देऊ शकतात, त्या कंपन्यांवर योग्य त्या पद्धतीने कारवाई केली जाईल, असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. (Health Minister Rajesh Tope On Corona Fake Testing Kit)

“जीसीसी कंपनीच्या टेस्टिंग किट्सबाबत एनआयव्हीचा रिपोर्ट येईपर्यंत त्या वापरण्यासाठी असमाधानकारक आहेत. या किट्सचा वापर निश्चितप्रकारे करण्यात येऊ नये. त्यामुळे या कंपन्यांच्या टेस्टिंग किट्स वापरु नये,” असे स्पष्ट निर्देश राजेश टोपे यांनी दिले आहे.

“सध्या एनआयव्हीच्या वतीनं टेस्टिंग किट्स वापरण्याच्या दृष्टीकोनातून पुरवठा करण्यात येणार आहे. येत्या काळात अशा घटना घडू नये म्हणून आपल्याला सातत्याने प्रमाणीकरण करणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.

“टेस्टिंग किट्सच प्रमाणीकरण करण्यासाठी एक समिती स्थापन केली जाईल. या समितीत एनआयव्हीचे तज्ज्ञही सहभागी असतील. या टेस्टिंगट कीट प्रत्येक बाबतीत व्यवस्थित आहेत का याची तपासणी करावी लागेल. तसेच अधिक टेस्टिंग किट्स या एनआयव्हीच्या किट्सोबत तपासाव्या लागतील आणि त्याची दुरुस्ती करावी लागेल,” असेही राजेश टोपेंनी सांगितले.

“तसेच ज्या कंपन्या अशाप्रकारे खोट्या किट देऊ शकतात, अशा कंपन्यांवर योग्य पद्धतीने कारवाईची आवश्यकता असून ती लवकरच केली जाईल,” असा इशाराही राजेश टोपेंनी दिला.

“थंडीत कोरोनाविषयी सतर्कता बाळगा” 

“थंडीमध्ये कोरोनाविषयी सतर्कता बाळगलीच पाहिजे. काळजी घेतलीच पाहिजे. तसेच या काळात सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क या गोष्टी पाळल्या पाहिजेत. जर आपण या गोष्टीची काळजी घेतली तर निसर्गाच्या दृष्टीकोनातून आपल्याला निसर्गाचं ऋतू बदलता येत नाही. सिझन बदलता येत नाही. त्यामुळे आपण आपली काळजी घ्यावी. कोरोनाला दूर ठेवावे असं आवाहन राजेश टोपे यांनी केलं.” (Health Minister Rajesh Tope On Corona Fake Testing Kit)

संबंधित बातम्या : 

राज्यासाठी आनंदाची बातमी, हॉटस्पॉट जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या घटली

सोलापुरातील हिंगणी प्रकल्प ओव्हर फ्लो,  भोगावती नदीला पूर

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.