Radhanagari Dam : उजनी धरण 90 टक्के भरले, राधानगरी धरणातून भोगावती नदी पत्रात 3028 क्यूसेक पाण्याचा विसर्ग

राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा उघडला उघडण्यात आला आहे. आज पहाटे 6 नंबरचा दरवाजा उघडला. कारण मागच्या दोन दिवसांपासून धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु आहे.

Radhanagari Dam : उजनी धरण 90 टक्के भरले, राधानगरी धरणातून भोगावती नदी पत्रात 3028 क्यूसेक पाण्याचा विसर्ग
राधानगरी धरणातून भोगावती नदी पत्रात 3028 क्यूसेक पाण्याचा विसर्गImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Aug 10, 2022 | 7:20 AM

मुंबई : महाराष्ट्रात (Maharshtra) जुलै महिन्यात मुसळधार पाऊस झाला. त्यामध्ये महाराष्ट्रातील अनेक धरणं (Dam) भरली होती. तसेच अनेक धरणांनी आपली अर्ध्यापेक्षा अधिक पातळी पाण्याने गाठली होती. लवकर धरण भरल्याने शेतकरी देखील आनंदी आहे. परंतु ज्या भागात अधिक पाऊस झाला तिथं मात्र परिस्थिती वेगळी असल्याचे पाहायला मिळते. कारण अनेक ठिकाणी महाराष्ट्रात पीकांचे नुकसान केले आहे. अतिवृष्टी (Heavy Rain) झाल्यानंतर लोकांच्या पिकांचं अधिक नुकसान झालं आहे. दोन दिवसांपासून पुन्हा सुरु झालेल्या पावसामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पूरजन्यस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात दोन दिवसात मुसळधार पाऊस झाला असून अनेक नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे नदी जवळच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

उजनी धरण आज पहाटे 90.22 टक्‍के भरले

पुणे ,सोलापूर,नगर जिल्ह्यासाठी वरदायिनी ठरलेले उजनी धरण आज पहाटे 90.22 टक्‍के भरले आहे. धरण क्षेत्रात झालेला पाऊस व पुणे जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे उजनी धरणावरील साखळी धरणात मोठ्या प्रमाणात पाणी साठा झाल्याने या धरणांतून होत असणारा पाण्याचा विसर्ग यामुळे आज पहाटे उजनी धरणाने नव्वद टक्‍क्‍यांची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे आगामी वर्षात सोलापूर शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटला असून धरणावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांचीही चिंता दूर झाली आहे. येवला तालुक्यातील उत्तर भागामधील पाटोदा, शिरसगाव लौकि, कातरणी सह परिसरातील गावांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात नदी नाल्यांना पुराचे पाणी आल्याने पुराचे पाणी आले होते. तर काही ठिकाणी द्राक्ष बाग व मका पीक पाणी खाली गेल्याने मोठ्या प्रमाणात याचा फटका बळीराजाला बसणार असून पाटोदा येथील नदीपात्रात पाणी आल्याने पाटोदा – लासलगाव या दोन्ही गावाचा संपर्क तुटला होता.

हे सुद्धा वाचा

राधानगरी धरणाचा दरवाजा उघडला

राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा उघडला उघडण्यात आला आहे. आज पहाटे 6 नंबरचा दरवाजा उघडला. कारण मागच्या दोन दिवसांपासून धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु आहे. भोगावती नदी पत्रात 3028 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु सोडण्यात आला आहे.

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.