Video : नात्यागोत्यांच्या पलिकडचा लळा, हिंगोलीत गाईच्या वासराला चक्क शेळीचा पान्हा!

गाईच्या वासरा(Cow Calf)ला शेळी (Goat) दूध पाजताना कधी पाहिलंय का? हे ऐकून तुम्हाला कदाचित धक्का बसेल, पण हे सत्य आहे. हे विहंगम दृश्य बघून लोक आश्चर्यचकित झालेत.

Video : नात्यागोत्यांच्या पलिकडचा लळा, हिंगोलीत गाईच्या वासराला चक्क शेळीचा पान्हा!
गाईच्या वासराला दूध पाजताना शेळी
Follow us
| Updated on: Jan 24, 2022 | 11:19 AM

हिंगोली : गाईच्या वासरा(Cow Calf)ला शेळी (Goat) दूध पाजताना कधी पाहिलंय का? हे ऐकून तुम्हाला कदाचित धक्का बसेल, पण हे सत्य आहे. हे विहंगम दृश्य बघून लोक आश्चर्यचकित झालेत. औंढा नागनाथ (Aundha Nagnath) तालुक्यातल्या पिंपळदरी इथलं हे दृश्य आहे. धम्मादीप बबन भगत यांच्याकडे गुरं, शेळ्या, पटावरील बैल आहेत. ते खूप जीव ओतून या सर्वांचं संगोपन करतात. त्यांनी पटावरच्या बैलांप्रमाणेच इतर प्राण्यांचीही माणसाप्रमाणं नाव ठेवली आहेत. त्यांच्या या कुटुंबातच हा एक अनोखा प्रकार घडला आहे.

दिवसभर ढाळत होती अश्रू

त्यांच्याकडे राणी नावाच्या गाईबरोबर मनी नावाची शेळी सोबतच राहायची, सोबतच चरायची. त्या दोघींना एकमेकींच्या शेजारीच बांधावं लागायंच, कारण त्यांची चांगलीच गट्टी जमली होती. पण दुर्दैवानं राणी या गायीचा पहिल्या वितात मृत्यू झाला आणि हे बघून राणी अक्षरश: दिवसभर अश्रू ढाळत होती. जन्मलेलं वासरू तिच्या शेजारी भूकेनं व्याकुळ झालं होतं. त्याचवेळी मनी या शेळीनं वासराला स्वतःच दूध पाजून भूक भागवली, मात्र हे केवळ एकदा नाही तर सलग दोन महिने…

मुक्या जनावरानं घालून दिला आदर्श

यापूर्वी मनीने एक पिल्लू दिलं होतं, पण ते काही दिवसातच मृत्यू पावलं. त्यामुळे मनी वासराला दूध पाजू शकत होती. वासराचा लागलेला लळा तिला परत पिल्लं झाल्यानंतरही सुटला नाही. आज ही मनी तिच्या दोन पिल्लांबरोबर वासराला पाजत असते. आईच्या पश्चात सावत्र आई मुलांचा सांभाळ करीत नसताना मनी या मुक्या जनावरानं गाईच्या वासराला लावलेला लळा नात्यागोत्यांच्या पलीकडला आहे.

शेतकऱ्याचा नाद नाय करायचा! कार विकणारा म्हणाला, खिशात 10 रुपये आहेत का? पठ्ठ्यानं शर्थ लावून जिरवली, नेमकं काय घडलं?

80 point turn : धोकादायक टेकडीवरून अशी काही गाडी वळवली, चित्तथरारक व्हिडिओ पाहून अंगावर येईल काटा! पाहा Video

Nashik weather | नाशकासह उत्तर महाराष्ट्रावरही ‘पाक’ संकट; द्राक्ष, आंबा, कांदा पीक संकटात? थंडी, धूळ कायम राहणार?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.