तरुणाने उधळले हिंगोलीच्या कृषी अधीक्षक कार्यालयासमोर पैसे? कारण ऐकूण व्हालं हैराण

हिंगोली जिल्ह्यात 700 च्या वर आणि महाराष्ट्रात 21 हजारांच्या वर कंपन्या आहेत. या कंपन्या विषारी औषध मिसळून खत विक्री करत आहेत.

तरुणाने उधळले हिंगोलीच्या कृषी अधीक्षक कार्यालयासमोर पैसे? कारण ऐकूण व्हालं हैराण
Follow us
| Updated on: May 22, 2023 | 3:20 PM

हिंगोली : दोन-तीन महिन्यांपूर्वी एक सरपंचाने अनोखे आंदोलन केले होते. गटविकास अधिकारी पैसे घेतल्याशिवाय सह्या करत नाही. त्यामुळे सामान्यांची कामे थांबली आहेत, असे या सरपंचाचे म्हणणे होते. यासाठी त्यांनी बीडीओ कार्यालयासमोर पैसे फेको आंदोलन करत जनतेचे लक्ष वेधले होते. आता असाच एक प्रकार हिंगोली जिल्ह्यात उघडकीस आला आहे. हिंगोली जिल्ह्यात बोगस निविष्ठाची विक्री होते. कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्याने एका पत्राद्वारे हिंगोलीच्या कृषी अधीक्षक कार्यालयाकडे वारंवार केली. मात्र अनेक महिने उलटूनही कृषी विभाग संबंधित कंपनीवर कारवाई करत नाही. त्यामुळे आज नामदेव पतंगे या शेतकऱ्याने स्वतःच्या घरचे दागिने मोडून टोपलं भरून पैशांची उधळण केली.

hingoli 2 n

टोपलाभर नोटा फेकल्या

नामदेव पतंगे या शेतकऱ्याने 19 मे 2023 रोजी कृषी अधीक्षक कार्यालयाला पत्राद्वारे कळवले होते. त्यानुसार, बोगस निविष्ठा विक्री करत असलेल्या कंपनीवर कारवाई करण्यात यावी. ही कारवाई होत नसल्याने आम्ही आपल्या कृषी विभागाच्या कार्यालयात आंदोलन करणार. त्याच अनुषंगाने आज 11:30 वाजता 500, 50, 100, 10 रुपयांच्या टोपलं भर नोटा आणण्यात आल्या.

हे सुद्धा वाचा

आतातरी लक्ष देण्याचे आवाहन

राज्याचे कृषिमंत्री असलेले अब्दुल सत्तार हे हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांनासुद्धा आवाहन केले की, तुमच्या कृषी विभागाला समजावून सांगा. तुमचा कृषी विभाग ऐकायला तयार नाही. साहेब माझी विनंती आहे की आतातरी लक्ष द्या. अन्यथा आम्हाला जीव द्यावा लागेल. असं या आंदोलन करणाऱ्या तरुणाचं म्हणण होतं.

एक महिना सँपलचा रिझल्ट येत नाही

हिंगोली जिल्ह्यात 700 च्या वर आणि महाराष्ट्रात 21 हजारांच्या वर कंपन्या आहेत. या कंपन्या विषारी औषध मिसळून खत विक्री करत आहेत. आम्ही वारंवार कृषी विभागाला निवेदन देतो की, साहेब यांच्यावर कारवाई करा. पण, एक महिना सँपलचा रिझल्ट येत नाही. त्यांच्यावर कारवाई होत नाही.

घरचे दागिने मोडून आणले पैसे

तुमचं आणि कंपनीचे साटेलोटे आहे का? त्यांनी काही उत्तर दिले नाही. याचा अर्थ ह्या कंपनीचे आणि कृषी अधीक्षक, गुणनियंत्रण अधिकारी यांचे साटेलोटे आहे. म्हणून आम्ही आमच्या घरचे आज दागिने मोडून जिल्हा कृषी अधीक्षक यांना पैसे आणून दिले. कंपनीकडून पैसे न घेता आमच्य कडून पैसे घ्या आणि या कंपन्यांवर कारवाई करा, अशी मागणी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता तथा शेतकरी नामदेव पतंगे यांनी केली.

बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.