राजीव सातव यांच्या आई-पत्नीच्या अश्रूंनी कार्यकर्त्यांनाही झाले अश्रू अनावर…; ट्विट करत म्हणाल्या…
एकमेकींना अलिंगन देऊन धीर देण्याचा प्रयत्नही केला आहे. त्याचबरोबर माजी मंत्री रजनीताई सातव यांनी आमदार डॉक्टर प्रज्ञाताई सातव यांचे डोळे पुसून सुनबाईला सावरण्याचा प्रयत्नही केला आहे.
हिंगोली : काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांजवळचे आणि माजी खासदार राहुल गांधी यांच्या जवळची व्यक्ती म्हणून खासदार राजीव सातव यांची ओळख होती. कोरोनाच्या काळात खासदार राजीव सातव यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे राज्यातील काँग्रेसचा एक महत्वाचा नेता गेल्याची भावना राजकीय नेत्यांनी व्यक्त केली होती. त्यांचे निधन होऊन आता दोन वर्षे झाली आहेत त्यामुळे त्यांचा आज द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या कळमनुरी येथील निवासस्थानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
त्यावेळी त्यांना अभिवादन करताना दिवंगत राजीव सातव यांच्या मातोश्री माजी मंत्री रजनीताई सातव व त्यांच्या पत्नी आमदार डॉक्टर प्रज्ञा सातव अश्रूंना वाट मोकळी करून दिली आहे.
यावेळी त्यांनी एकमेकींना अलिंगन देऊन धीर देण्याचा प्रयत्नही केला आहे. त्याचबरोबर माजी मंत्री रजनीताई सातव यांनी आमदार डॉक्टर प्रज्ञाताई सातव यांचे डोळे पुसून सुनबाईला सावरण्याचा प्रयत्नही केला आहे.
सासू-सुनांचे हे दुःख पाहून उपस्थितांचे डोळ्याच्या कडा पानावल्या होत्या. सोशल मीडियावरही हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
….आमदार प्रज्ञा सातव यांचे ट्विट…
मी वचन देते की तुमचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करेल असं म्हणत आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांचे व्हिडिओ पोस्ट करून पती दिवंगत खासदार राजीव सातव यांना अभिवादन केलं आहे. त्यांनी ट्विट केले आहे की, “२ साल पहले आज ही के दिन आप हमें छोड़कर चले गए थे।
आप शारीरिक रूप से हमारे साथ नहीं हैं लेकिन आपके आदर्श आज भी आपके प्रत्येक वफादार कार्यकर्ता में जीवीत हैं। मैं आपसे वादा करती हूं कि मैं आपके अधूरे सपनों को पूरा करना जारी रखूंगी और जो सही है उसके लिए लड़ती रहूँगी ।” प्रज्ञा सातव यांनी ट्विट करत त्यांनी राजीव सातव यांच्या आठवणीना उजाळा दिला आहे.
त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांनी त्यांचे राजकारण त्यांच्या विचारांच्या प्रेरणाने कसे जागृत ठेवले आहे, त्याचीही गोष्ट त्यांनी आपल्या ट्विटमधून त्यांनी सांगितले आहे.