‘क्या तुमने कभी किसी से प्यार किया?’ हिंगोलीतील प्रेमवेड्या तरुण शेतकऱ्याचं थेट उद्धव ठाकरेंना पत्र

हिंगोली जिल्ह्यातील एका प्रेमवेड्या तरुणाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भावनिक पत्र लिहिलं आहे. या पत्रात मुख्यमंत्रीसाहेब, तुम्ही कधी प्रेम केलं आहे का? असा सवाल त्याने मुख्यमंत्र्यांना केलाय.

'क्या तुमने कभी किसी से प्यार किया?' हिंगोलीतील प्रेमवेड्या तरुण शेतकऱ्याचं थेट उद्धव ठाकरेंना पत्र
उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री
Follow us
| Updated on: Apr 08, 2022 | 5:35 PM

मुंबई : हिंगोली जिल्ह्यातील एका प्रेमवेड्या तरुणाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना भावनिक पत्र (Emotional letter) लिहिलं आहे. या पत्रात मुख्यमंत्रीसाहेब, तुम्ही कधी प्रेम केलं आहे का? असा सवाल त्याने मुख्यमंत्र्यांना केलाय. शेतकरी असल्याने प्रेम करण चुकीचं आहे का? असा सवाल त्याने या पत्रातून विचारला आहे. हे पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Latter) होतंय. हिंगोलीतील व्हायरल होणाऱ्या या पत्रात कुणाचंही नाव नाहीये. पण हे पत्र हिंगोली जिल्ह्यातील एक तरुण शेतकऱ्याने लिहिलं असल्याचं या पत्रातील मजकुरावरून लक्षात येतंय. त्याने थेट मुख्यमंत्र्यांना तुम्ही कुणावर प्रेम केलंय का असा प्रश्न विचारलाय. हे पत्र सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे

पत्रातील मजकूर काय आहे?

cm latter

“उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब, पत्र लिहितांना खुप दुःख होत आहे. प्रेम धन दौलतीवर अवलंबून आहे का…? मी प्रेम केलं पण मला शेतजमीन कमी आहे म्हूणन माझ्या प्रेमाला विरोध होत आहे. तुम्ही जनतेचे प्रश्न सोडवता. तुम्ही ही कधी तरी प्रेम केलं आहे का? केलं असेल तर उत्तर दया…” असं म्हणत या तरूणाने थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सवाल विचारलाय. हिर-रांझा, लैला -मजनु, सोनी-महिवाल यांनी प्रेम केलं तर त्यांना मृत्यू का? प्रेमात विरह का? साहेब शेतकरी होऊन प्रेम करणं चुकीचं आहे का? खरं तर तुम्हाला भेटून खुप रडाव वाटतंय कारण आजपर्यंत तुम्ही सगळ्यांचे प्रश्न सोडवले. तुम्ही सगळ्यांचं ऐकून घेता मग माझं का नाही?” असा प्रश्न या तरुणाने उद्धव ठाकरे यांना केलाय.

“या पुरोगामी महाराष्ट्रात प्रेमात आत्महत्या करावी लागत असेल तर मी अशा प्रेमाचा धिक्कार करतो. माझ्या प्रश्नांची उत्तरं दया… मी तुमच्या उत्तराची वाट पाहात आहे. अन्यथा माझ्याकडे आत्महत्या करण्यापलीकडे दुसरा पर्याय नाहीये… “, असा या पत्रातील मजकूर आहे.

हिंगोलीतील व्हायरल होणाऱ्या या पत्रात कुणाचंही नाव नाहीये. पण हे पत्र हिंगोली जिल्ह्यातील एक तरुण शेतकऱ्याने लिहिलं असल्याचं या पत्रातील मजकुरावरून लक्षात येतंय. त्याने थेट मुख्यमंत्र्यांना तुम्ही कुणावर प्रेम केलंय का असा प्रश्न विचारलाय. हे पत्र सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.

संबंधित बातम्या

Social Media Trending : वधू-वराला लग्नात पेट्रोल-डिझेल गिफ्ट! सोशल मीडियावर चर्चाच चर्चा…

Video : एमर्जंन्सी लॅंडिंगच्यावेळी विमानाला मोठी दुर्घटना, भीषण आग, विमानाचे जागीच तुकडे

Pushpa Song : पुष्पाचं परदेशी व्हर्जन!, सामी-सामी गाण्यावर पॅरिसमधल्या नागरिकांचा कमाल डान्स, पाहा व्हीडिओ…

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.