AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काळ आला होता, पण वेळ नाही, भलंमोठं होर्डिंग थेट पिकअपवर कोसळलं, पुढचा भाग उद्ध्वस्त, दोन जण जखमी

काळ आला होता पण वेळ नाही, अशीच काहिशी घटना कल्याणमध्ये समोर आली आहे (Hoarding collapsed on Mahindra Bolero Van in Kalyan due to heavy wind)

काळ आला होता, पण वेळ नाही, भलंमोठं होर्डिंग थेट पिकअपवर कोसळलं, पुढचा भाग उद्ध्वस्त, दोन जण जखमी
मोठं होर्डिंग थेट पिकअपवर कोसळलं, जीव वाचला पण कॅबिनमध्येच अडकले, बाहेर काढण्यासाठी मोठा खटाटोप
Follow us
| Updated on: May 17, 2021 | 6:00 PM

कल्याण (ठाणे) : काळ आला होता पण वेळ नाही, अशीच काहिशी घटना कल्याणमध्ये समोर आली आहे. कल्याणमध्ये वादळी वारे सुरु आहेत. या वाऱ्यांमुळे अनेक झाडं उन्मळून पडत आहेत. कल्याणच्या शीळ रोडवर तर एक भला मोठा जाहिरातीचा फलक (होर्डिंग) थेट एका चालत्या टेम्पोवर कोसळला. या टेम्पोचा पुढचा भाग, चेसी आणि केबिन पूर्णपणे उद्धवस्त झाली आहे. मात्र, सुदैवाने केबिनमध्ये असणारा चालक आणि त्याचा जोडीदार बचावला आहे. या दुर्घटनेमुळे ते गंभीर जखमी झाले आहेत. पण सुदैवाने त्यांचा जीव बचावला आहे.

अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या तौत्के चक्रीवादळाने रौद्र रुप धारण केलंय. किनारपट्टीपासून थोडं लांब असलं तरी किनारपट्टीला समांतर असं ते पुढे गुजरातच्या दिशेला सरकत आहे. या चक्रीवादळामुळे मुंबईसह ठाणे आणि रायगड जिल्ह्यांमध्ये प्रचंड वेगाने वारे वाहत असून पाऊसही पडत आहे. कल्याणमध्येही प्रचंड गतीने वादळी वारे वाहत आहेत. त्यामुळे अनेक इमारतींवरील पत्रे हवेत उडून खाली पडत आहेत. अनेक झाडं उन्मळून जमीनीवर पडत आहे. कल्याणच्या शीळ रोडवर तर धक्कादायक घटना समोर आली आहे. तिथे रस्त्याच्या मधोमध असलेला भलामोठा जाहिरात फलक एका चालत्या टेम्पोवर पडला आहे. त्यामुळे टेम्पोतील दोन जण गंभीर जखमी झाली आहेत.

फलक टेम्पोवर जोरात कोसळल्याने फसला

रस्त्याच्या मधोमध असलेला भलामोठा जाहिरातीचा फलक टेम्पोवर कोसळला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. रस्त्याने जाणाऱ्या इतर नागरिकांनी तो फलक उचलण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना अपयश आलं. यावेळी टम्पोच्या केबिनमध्ये दोन माणसं अडकली होती. त्यांना टेम्पोतून बाहेर काढणं जास्त जरुरीचं होतं. अन्यथा तिथे त्यांचा जीव गुदमरला असता. त्यामुळे काही नागरिकांनी तो फलक उचलण्याचा शर्थीने प्रयत्न केला. पण फलक जास्त वजनदार होतं. याशिवाय ते टेम्पोवर मोठ्या वेगाने कोसळलं होतं. त्यामुळे ते टेम्पोत फसलं होतं.

कटरच्या साहाय्याने जखमीला बाहेर काढलं

अखेर याबाबत अग्निमशन दलाला माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाचे अधिकारी नंदकुमार शेंडकर यांना या घटनेची माहिती मिळताच ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने कटर मशीनच्या सहाय्याने टेम्पोच्या केबिनचे पत्रे कापून टेम्पोत गंभीर जखमी असलेल्या दोघांना बाहेर काढले. त्या दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. फायर ब्रिगेडचे पथक वेळीच घटनास्थळी पोहचल्याने दोन जणांचा प्राण वाचले आहेत.

कल्याणमध्ये इमारतींचे पत्रे पडले, व्हिडीओ व्हायरल

कल्याणमध्ये प्रचंड वेगाने वारे वाहत आहेत. या वाऱ्यांचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. कल्याणमधील अनेक इमारतींच्या टेरेसवर लावण्यात आलेले पत्रे जास्त वाऱ्यामुळे हवेत उडून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनेचे व्हिडीओ देखील समोर आले असून ते सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे पत्रे रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या डोक्यावर पडून दुर्घटना घडण्याची शक्यतादेखील आहे. याशिवाय वाऱ्यामुळे विजेचे खांब देखील पडण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा : SBI चा मोठा निर्णय, बुडलेल्या पैशातून मुक्त होण्यासाठी बँक 235 कोटींचं बॅड लोन विकणार

पाकच्या उलट्या बोंबा... भारताविरोधात पाकिस्तानं घेतले 'हे' मोठे निर्णय
पाकच्या उलट्या बोंबा... भारताविरोधात पाकिस्तानं घेतले 'हे' मोठे निर्णय.
तर रक्ताचे पाट वाहतील, भारताच्या निर्णयानंतर सईदचा तो व्हिडिओ व्हायरल
तर रक्ताचे पाट वाहतील, भारताच्या निर्णयानंतर सईदचा तो व्हिडिओ व्हायरल.
'जे कधीही विमानात बसले नाही, त्यांना..' नरेश म्हस्केंचं वादग्रस्त वधान
'जे कधीही विमानात बसले नाही, त्यांना..' नरेश म्हस्केंचं वादग्रस्त वधान.
दिल्लीच्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयात केक? पहलगाम हल्ल्याचं दुःख नाही?
दिल्लीच्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयात केक? पहलगाम हल्ल्याचं दुःख नाही?.
पहलगामच्या घटनास्थळावर सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांकडून रिक्रिएशन?
पहलगामच्या घटनास्थळावर सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांकडून रिक्रिएशन?.
'वडिलांचा मृतदेह तिथेच ठेऊन मी.. ', हर्षल लेलेने सांगितला थरारक अनुभव
'वडिलांचा मृतदेह तिथेच ठेऊन मी.. ', हर्षल लेलेने सांगितला थरारक अनुभव.
वडिलांची वाढदिवसाच्या एक दिवसाआधी हत्या, चिमुकल्याने सांगितला थरार
वडिलांची वाढदिवसाच्या एक दिवसाआधी हत्या, चिमुकल्याने सांगितला थरार.
हीच ती जागा जिथं पर्यटकांवर गोळ्या, तिथली वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी
हीच ती जागा जिथं पर्यटकांवर गोळ्या, तिथली वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी.
दहशतवाद्यांना भारताचं स्पिरिट कधीच मोडता येणार नाही - पंतप्रधान मोदी
दहशतवाद्यांना भारताचं स्पिरिट कधीच मोडता येणार नाही - पंतप्रधान मोदी.
प्रत्येक दहशतवाद्याला शोधून...पहलगामच्या हल्ल्यानंतर मोदी काय म्हणाले?
प्रत्येक दहशतवाद्याला शोधून...पहलगामच्या हल्ल्यानंतर मोदी काय म्हणाले?.