शिक्षण विभागाची करामतः परीक्षा फॉर्म भरला गणिताचा अन् गुण मिळाले जीवशास्त्राचे, नाशिकमधला प्रकार

नाशिकमध्ये (Nashik) एका विद्यार्थिनीने बारावीचा परीक्षा (HSC Exam) फॉर्म गणिताचा भरला होता. मात्र, तिला चक्क जीवशास्त्राचे गुण प्रदान करण्यात आले. आता त्या विद्यार्थिनीला अभियांत्रिकीचे शिक्षण घ्यायचे आहे. शिक्षण विभागाच्या या विचित्र करामतीमुळे विद्यार्थिनीचे करिअर उद्धवस्त होण्याची वेळ आली आहे.

शिक्षण विभागाची करामतः परीक्षा फॉर्म भरला गणिताचा अन् गुण मिळाले जीवशास्त्राचे, नाशिकमधला प्रकार
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Sep 18, 2021 | 3:21 PM

नाशिकः आपल्या येथे काहीही होऊ शकते. फक्त तुम्ही विश्वास ठेवायला तयार पाहिजे. आता हेच पाहा. नाशिकमध्ये (Nashik) एका विद्यार्थिनीने बारावीचा परीक्षा (HSC Exam) फॉर्म गणिताचा भरला होता. मात्र, तिला चक्क जीवशास्त्राचे गुण प्रदान करण्यात आले. आता त्या विद्यार्थिनीला अभियांत्रिकीचे शिक्षण घ्यायचे आहे. शिक्षण विभागाच्या या विचित्र करामतीमुळे विद्यार्थिनीचे करिअर उद्धवस्त होण्याची वेळ आली आहे. (HSC Exam form filled Mathematics and Biology marks given, Incident at Brahma Valley College in Nashik)

नाशिकमधल्या स्नेहल देशमुख या विद्यार्थिनीचे ब्रह्मा व्हॅली महाविद्यालयात अॅडमिशन आहे. बारावीला विज्ञान शाखेत असताना तिने 2021 च्या परीक्षेसाठी फॉर्म भरला. त्यावर इंग्रजी, हिंदी, भुगोल, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि गणित विषय लिहिले. त्यात यावर्षीही कोरोनाची लाट सुरू असल्याने बारावीच्या परीक्षा झाल्या नाहीत. अंतर्गत मूल्यमापन आणि गुणांकनानुसार निकाल जाहीर करण्यात आला. त्यात स्नेहलला बारावीत चक्क 82 टक्के गुण मिळाले. तिला याचा भरपूर आनंद झाला. मात्र, काही वेळातच तिची घोर निराशा झाली. तिने गुणपत्रक पाहिले असता त्यावर गणिताऐवजी चक्क जीवशास्त्राचा उल्लेख होता. कारण स्नेहलला पुढे अभियांत्रिकीचे शिक्षण घ्यायचे आहे. ही चूक दुरुस्तीसाठी कॉलेज आणि शिक्षण मंडळाची परस्परांकडे टोलवाटोलवी सुरू झाली आहे. त्यामुळे तिचे करिअर उद्धवस्त होण्याची वेळ आली आहे.

शिक्षकाने केली चूक

महाविद्यालयाने चूक दुरुस्तीचा प्रस्ताव शिक्षण मंडळाला पाठवला. मात्र, शिक्षण मंडळाने आपली चूक नसल्याचे सांगितले. अखेर महाविद्यालयाने आपल्या येथील शिक्षकाने चुकीच्या विषयाचे गुण दिल्याची कबुली दिली आहे. तसा माफीनामा लिहून देत मंडळालाही पाठविला आहे. मात्र, मंडळाने पुढे त्यावर काहीही हालचाल केली नाही.

125 विद्यार्थिनींचे वर्ष जाणार वाया

प्रवेशाच्या नावाखाली तब्बल 125 विद्यार्थिनींना नाशिकरोड येथील एका महाविद्यालयाने गंडा घातल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे या विद्यार्थिनींचे वर्ष वाया जाणार आहे. मुंबई येथील श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठांतर्गत येत अससलेल्या साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित के. एन. केला महाविद्यालय नाशिकरोड येथे आहे. येथे सव्वाशे विद्यार्थिनींनी प्रवेश घेतला आहे. त्यासाठी प्रत्येकीने प्रवेशाचे साडेचार हजार रुपये भरले आहेत. आता विद्यापीठाकडून परीक्षा सुरू आहेत. मंगळवारी रात्री एका विद्यार्थिनीच्या व्हॉट्सअॅपवर परीक्षेचे वेळापत्रक आले. तेव्हा त्यात कला व वाणिज्य शाखेतील दुसऱ्या व तिसऱ्यात तसेच एम. ए. च्या दुसऱ्या वर्गातील अशा एकूण 125 जणींचा पेपर होता. या विद्यार्थिनी बुधवारी पेपर देण्यासाठी गेल्या. मात्र, त्यांच्या ऑनलाइन परीक्षेचा कोडच पेपर सुरू होण्यापर्यंत मिळाला नाही. शेवटी उशिरा या 125 विद्यार्थिनींचा प्रवेशच झाला नसल्याचे विद्यापीठाकडून कळविण्यात आले. (HSC Exam form filled Mathematics and Biology marks given, Incident at Brahma Valley College in Nashik)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.