Hsc Exam hall Ticket : बारावीच्या विद्यार्थ्यांना उद्यापासून मिळणार ऑनलाईन हॉलतिकीट, बोर्डाने काय सांगितलं?

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षांबाबत एक मोठी अपडेट बोर्डाकडून देण्यात आली आहे. उद्यापासून बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने हॉलतिकीट मिळणार आहे.

Hsc Exam hall Ticket : बारावीच्या विद्यार्थ्यांना उद्यापासून मिळणार ऑनलाईन हॉलतिकीट, बोर्डाने काय सांगितलं?
लवकरच मोठी नोकरभरती निघणारImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Feb 08, 2022 | 5:31 PM

पुणे : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी (Hsc Exam) परीक्षांबाबत एक मोठी अपडेट बोर्डाकडून देण्यात आली आहे. उद्यापासून बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने हॉलतिकीट (Hsc Exam hall ticket) मिळणार आहे. दुपारी 1 च्या पुढे विद्यार्थ्यांना हॉलतिकीट डाऊनलोड (Online Hall ticket) करता येणार आहे. अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डानं दिली आहे. गेल्या काही दिवसात कोरोना पुन्हा वाढल्याने यंदा दाहावी आणि बारावीच्या परीक्षाचं काय होणार याबबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी मुलांचं लसीकरण करत शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला. त्यानंतर परीक्षा ऑनलाईन घ्या, ऑफलाईन घ्या या मागणीसाठी विद्यार्थी आक्रमक होताना दिसून आले. त्यासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेर आक्रमक आंदोलनही केलं. मात्र शासनाने आपाला निर्णय बदलला नाही. परीक्षा ऑफलाईनच होणार हे स्पष्ट केलं, त्यानंतर आता हॉलतिकीट बाबत माहिती देण्यात आली आहे.

शनिवार, रविवार शाळा सुरू ठेवा

राज्यातील शिक्षकांनी शनिवार, रविवार शाळा चालू ठेवून विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम भरून काढा, कोरोनामुळे काही काळ शाळा बंद असल्याने अभ्यासक्रम मागे राहिला आहे, त्यासाठी तातडीने पााऊलं उचला अशा सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहे. त्यामुळे आता शाळा शनिवार, रविवारही सुरू राहण्याची शक्यता आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत स्वच्छ शाळा, सुंदर शाळा उपक्रमांतर्गत विजेत्या शाळांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. ऑनलाईन शाळांचा उपक्रम यशस्वी झाला पण प्रत्यक्ष शाळेची मजा ऑनलाईनमध्ये येत नाही हे मान्य केले पाहिजे, असेही अजित पवार म्हणाले आहेत.

दोन वर्षात विद्यार्थ्यांचंं मोठ नुकसान

दहावी, बारावीच्या परीक्षांच्या तारखा याआधीच जाहीर केल्या असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासाला आणि परीक्षेच्या नियोजनाला पुरसा वेळ मिळाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सरावावर भर देऊन परीक्षेला न घाबरता सामोरे जावं, असे आवाहन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केलं आहे. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे अनेक महिने शाळा बंद राहिल्या आहेत. त्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे आता प्रत्यक्ष शिक्षणावर राज्य सरकारकडून भर देण्यात येत आहे.

NEET Exam : नीट परीक्षा : इंटर्नशीप डेडलाईनबाबत सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाची तारीख ठरली, छगन भुजबळ यांच्याकडून महत्त्वाची माहिती

Amravati School Reopen : अमरावतीमध्ये शाळा कॉलेज सुरु करण्यास परवानगी, सार्वजनिक सुट्टीमुळं उद्यापासून वर्ग भरणार

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.