संजय राठोड म्हणतात, मी मागासवर्गीय, ओबीसी समाजाचा, घाणेरडं राजकारण केलं जातंय!

प्रसारमाध्यमं आणि समाजमाध्यमांवर दाखवण्यात येत असलेल्या गोष्टींमध्ये कोणतेही तथ्य नाही. | Sanjay Rathod

संजय राठोड म्हणतात, मी मागासवर्गीय, ओबीसी समाजाचा, घाणेरडं राजकारण केलं जातंय!
संजय राठोड
Follow us
| Updated on: Feb 23, 2021 | 2:32 PM

वाशिम: पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात घाणेरडे राजकारण करण्यात आले. मी मागासवर्गीय, भटक्या-विमुक्त आणि ओबीसी समाजाचा नेता आहे. या आरोपांच्या माध्यमातून माझं राजकीय आणि वैयक्तिक जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न होत असल्याचे वक्तव्य शिवसेना नेते संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी केले. (Sanjay Rathod press conference in Poharadevi)

ते मंगळवारी पोहरादेवी येथे आयोजित केलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी संजय राठोड यांनी पूजा चव्हाण प्रकरणात त्यांच्यावर झालेले सर्व आरोप फेटाळून लावले. हे सर्व आरोप चुकीचे आणि निराधार आहेत. प्रसारमाध्यमं आणि समाजमाध्यमांवर दाखवण्यात येत असलेल्या गोष्टींमध्ये कोणतेही तथ्य नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणाची चौकशी लावली आहे. त्यामधून तथ्य समोर येईल. मात्र, तोपर्यंत माझी, माझ्या कुटुंबाची आणि समाजाची बदनामी करु नका, अशी विनंती संजय राठोड यांनी केली. तसेच फक्त एका घटनेमुळे मला थेटं चुकीचं ठरवू नका, असेही त्यांनी सांगितले.

पूजा चव्हाणबद्दल राठोड काय म्हणाले?

पूजा चव्हाण या गौर बंजारा समाजातील तरुणीचा पुण्यात दुर्देवी मृत्यू झाला. तिच्या मृत्यूबाबत मला दु:ख आहे. चव्हाण परिवाराच्या दु:खात माझा समाज आणि कुटुंब सहभागी आहे. पूजा चव्हाण प्रकरणावरून महाराष्ट्रात घाणेरडं राजकारण सुरू आहे. ते चुकीचं आहे, मला आणि माझ्या कुटुंबीयांना उद्ध्वस्त करणारं हे राजकारण आहे, असा दावा संजय राठोड यांनी केला.

एका घटनेमुळे मला राँग बॉक्समध्ये उभं करू नका; संजय राठोड यांची हात जोडून विनंती

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात विरोधकांकडून झालेले आरोप आणि 15 दिवसाच्या अज्ञातवासानंतर अखेर वनमंत्री संजय राठोड यांनी मौन सोडलं. राठोड यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. पूजा चव्हाण प्रकरणात माझी आणि माझ्या समाजाची बदनामी केली जात आहे. पूजा चव्हाण पण आत्महत्या प्रकरणी घाणेरडं राजकारण सुरू आहे, असं सांगतानाच एका घटनेमुळे मला राँग बॉक्समध्ये उभं करू नका, अशी कळकळीची विनंतीच संजय राठोड यांनी हातजोडून केली.

संबंधित बातम्या 

Sanjay Rathod Pohradevi visit LIVE | संजय राठोड पोहरादेवी गडावर, समर्थकांची प्रचंड गर्दी

पूजा आत्महत्या करणाऱ्यांपैकी नव्हती, तिचे आईवडील गप्प का?; चुलत आजीचे सवाल

‘पोहरादेवी गडावर संजय राठोडांनी आपल्या कृत्याची कबुली द्यावी’

(Sanjay Rathod press conference in Poharadevi)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.