MP Amol Kolhe : ‘मी देशाचे पंतप्रधान मोदी यांच्या मागे ठामपणे उभा आहे’
देशात नको त्या कारणाने वातावरण दुषीत केलं जात आहे. ज्यामुळे देशात जे काही प्रश्न आहेत आणि जे तयार होत आहेत त्यांनी आपणच सोडवायला हवं. त्यासाठी आपल्याआपल्यात समंजस हवं.
मुंबई : गेल्या काही दिवसापासून देशात अनेक घटना घडत आहेत. ज्यामुळे देशातील एका समुहाला टार्गेट करण्यात येत आहे. त्यावरून देशात राजकारण तापलेले असतानाच आता अरब देशांमधूनही भारतावर टीका होत आहे. तसेच जे काही येथे चाललं आहे ते थांबवा असे म्हटले जात आहे. त्यावर आपली प्रतिक्रीया खासदार डॉ. अमोल कोल्हे (Dr Amol kolhe) यांनी दिली आहे. ते म्हणाले देशात विखारी वातावरण बनवले जात असून यामुळे देशाची प्रतिमा खराब होत आहे. जागतिक पातळीवर देशाला प्रश्न विचारले जात आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर टीका होत आहे. तर या गोष्टींचा देशाच्या विकासावर परिणाम होऊ नये यासाठी यांच्या मागे देश उभा असल्याचे म्हटले आहे. त्यांनी आली ही प्रतिक्रीया ट्वीटरच्या (Twitter) माध्यमातून दिली. तर राज्यात सध्या राज्यसभेच्या निवडणूकीवरून राजकारण तापले असून भाजपने अनेक वेळा राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे. यादरम्यान खासदार कोल्हे यांची अशी प्रतिक्रीया आल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
Today, I strongly stand behind my @PMOIndia and my country as a citizen first and an elected representative of this nation. We will resolve our issues internally and the vicious attack on #India due to mistakes of a few is unwarranted.@narendramodi
हे सुद्धा वाचा— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) June 7, 2022
पंतप्रधान हे केवळ व्यक्ती नाही
गेल्या काही महिन्यांपासून देशाच्या विविध भागात याना त्या कारणाने मुस्लिम समाजाला टार्गेट करण्यात येत आहे. त्यांच्यावर अत्यचार होत असल्याच्या बातम्या येत आहेत. यावरून देशाच सामाजिक वातावरण गढूळ झाले आहे. त्यामुळेच देशाचे पंतप्रधान मोदी यांच्यांवर देशातील विरोधकांकडून कडाडून टीका होत होती. तर काही दिवसांआधीच भाजपच्या दोन प्रवक्त्यांनी महंमद पैंगबर याच्यांवर वादग्रस्त विधान केले होते. त्यावर भाजपच्या कोणत्याच नेत्याने दिलगिरी व्यक्त केली नव्हती किंवी प्रतिक्रीया दिली नव्हती. त्यामुळे देशासह मुस्लिम राष्ट्रांनी पंतप्रधान मोदींचा निषेध केला. त्यावर खासदार कोल्हे यांनी हे खेदजनक असल्याचे म्हटले आहे. तर पंतप्रधान हे केवळ व्यक्ती नसून ती एक इंन्स्टीट्यूशन आहे. या इन्स्टीट्यूशनचा मान राखला गेला पाहिजे. देशाच्या प्रत्येक नागरिकाने पंतप्रधान पदाचा अभिमान हा बाळगळाच पाहिजे असे खासदार कोल्हे म्हणाले. तसेच माझ्या देशाच्या पंतप्रधानांचा कुणी अवमान करत असेल, तर या देशाचा नागरिक, लोकप्रतिनिधी म्हणून मी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे असेही खासदार कोल्हे म्हणाले.
राष्ट्रप्रथम ही संकल्पना विसरून चालणार नाही
तसेच खासदार कोल्हे म्हणाले, देशात नको त्या कारणाने वातावरण दुषीत केलं जात आहे. ज्यामुळे देशात जे काही प्रश्न आहेत आणि जे तयार होत आहेत त्यांनी आपणच सोडवायला हवं. त्यासाठी आपल्याआपल्यात समंजस हवं. तर आपण जे देशात करत आहोत. त्यामुळे जागतिक पातळीवर देशाची प्रतिमा मलिन होत आहे. याचा परिणाम आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो. त्यासाठी आपण भान ठेवून आपल्या पंतप्रधानांबद्दल आणि येथील इतर समाजाबद्दल बोलायला हवं असेही खासदार कोल्हे म्हणाले. तेसच राष्ट्रप्रथम ही संकल्पना विसरून चालणार नाही आणि राष्ट्रगीताचा बाधा येईल केवळ पावलातल्या पावलात राजकारणात याच भान प्रत्येकाने ठेवलं पाहिजे.