Tukaram Mundhe Corona | ‘ऑल इज वेल’, तुकाराम मुंढेंची फेसबुक पोस्ट
नागपूरचे माजी आयुक्त आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव तुकाराम मुंढे यांनी फेसबुक पोस्ट लिहित जनतेला आवाहन केलं आहे (IAS Officer Tukaram Mundhe Facebook post).
नागपूर : नागपूरचे माजी आयुक्त आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव तुकाराम मुंढे यांनी फेसबुक पोस्ट लिहित जनतेला आवाहन केलं आहे (IAS Officer Tukaram Mundhe Facebook post). कोणतीही लक्षणं नसताना मी कोरोना पॉझिटीव्ह आलो आहे. त्यामुळे मी शासनाच्या सर्व गाईडलाईन्स पाळत आहे. तुम्ही सर्वांनी देओखील गृह विलगीकरणाच्या दिशानिर्देशांचं पालन करावं, असं आवाहन तुकाराम मुंढे यांनी केलं आहे.
तुकाराम मुंढे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं, “मागील साडे पाच महिने कोरोनाशी लढत असताना 24 ऑगस्ट रोजी माझी कोव्हिड चाचणी पॉझिटिव्ह आली. लक्षणे नसल्यामुळे मात्र पॉझिटिव्ह आल्याने शासनाच्या गाईडलाईन्सनुसार मी स्वतःला गृह विलगीकरणात ठेवले. या काळात गृह विलगीकरणाचे सर्व नियम मी पाळत आहे. मास्क लावणे, कुटुंबातील कुठलाही सदस्य मी असलेल्या खोलीत न येणे, व्हिटॅमिन सी, बी कॉम्प्लेक्स आणि झिंक गोळ्यांचे सेवन करणे, थर्मल स्कॅनिंग द्वारे ठराविक काळानंतर शरीराचे तापमान तपासणे आदी सर्व दिशानिर्देशांचे पालन करीत आहे.”
“ज्यांना-ज्यांना लक्षणे नाहीत मात्र ते पॉझिटीव्ह आले आहेत, अशा सर्वांनी गृह विलगीकरणाच्या दिशानिर्देशांचे पालन करावे. आपणापासून इतरांना संक्रमण होणार नाही, याची काळजी घ्यावी. ज्येष्ठांचे आशीर्वाद आणि आपणा सर्वांच्या शुभेच्छा सोबत आहेतच. या शुभेच्छासोबतच सर्व नियम पाळत विलगीकरणाचा काळ मी पूर्ण करेन, असा विश्वास देतो,” असंही तुकाराम मुंढे यांनी नमूद केलं. त्यांनी आपल्या पोस्टची सुरुवात आणि शेवट ऑल इज वेल असं लिहून केली. यातून त्यांनी सर्व काही ठिक आहे, असाच संदेश दिला आहे.
दरम्यान, तुकाराम मुंढे यांची नुकतीच पुन्हा एकदा बदली झाली. नागपूर आयुक्तपदावरुन बदली करुन त्यांना मुंबईत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव नियुक्ती देण्यात आली आहे. त्याआधीच तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण झाली होती. (IAS Officer Tukaram Mundhe transferred to Mumbai)
नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना तुकाराम मुंढे यांनी महापालिका आयुक्त म्हणून कडक निर्बंध आणल्याचे दिसत होते. मात्र यावरुनच महापौर आणि भाजप नेते संदीप जोशी यांच्याशी मुंढे यांचे तीव्र मतभेद पाहायला मिळाले. मात्र, आता त्यांच्या बदलीवरुन नागरिकांमध्ये नाराजी दिसत आहे. नागरिकांकडून या बदलीच्या विरोधासाठी आंदोलनाचीही तयारी सुरु आहे.
संबंधित बातम्या :
Tukaram Mundhe | आपण नक्की जिंकू, आयुक्त तुकाराम मुंढेंना कोरोनाची लागण
तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली, नागपूरचे धडाकेबाज महापालिका आयुक्त आता मुंबईत!
IAS Transfer | तुकाराम मुंढे यांची बदली, नागपूर महापालिका आयुक्तपदी कोण?
संबंधित व्हिडीओ :
IAS Officer Tukaram Mundhe Facebook post