कोरोनाची तिसरी लाट, मृत्यू दर ते हवेतील संसर्गाचा धोका, आयसीएमआरच्या माजी संचालकांकडून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे

आम्ही आयसीएमआरचे माजी संचालक डॉ. रमण गंगाखेडकर यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी सर्वसामान्यांच्या मनातील अनेक शंकाविषयी माहिती दिली (ICMR Former Chief Raman Gangakhedkar on Corona)

कोरोनाची तिसरी लाट, मृत्यू दर ते हवेतील संसर्गाचा धोका, आयसीएमआरच्या माजी संचालकांकडून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे
Follow us
| Updated on: Apr 17, 2021 | 10:25 PM

मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा प्रचंड प्रमाणात वाढतोय. नव्या रुग्णांसह मृत्यदर देखील प्रचंड प्रमाणात वाढला आहे. देशात दररोज हजारो रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू होतोय. त्यात लान्सेट कोविड- 19 कमिशनच्या अहवालात जून महिन्यात देशात दरदिवशी 2300 रुग्ण दगावण्याची भीती वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर आम्ही आयसीएमआरचे माजी संचालक डॉ. रमण गंगाखेडकर यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी सर्वसामान्यांच्या मनातील अनेक शंकाविषयी माहिती दिली. याबाबत आम्ही प्रश्न आणि उत्तर स्वरुपात तुम्हाला माहिती देणार आहोत (ICMR Former Chief Raman Gangakhedkar on Corona).

प्रश्न : कोरोनाचा मृत्यूदर वाढलाय. त्यावर काय सांगाल?

उत्तर : कोरोनाची सध्याची लाट घातक आहे, हे म्हणत असताना एक लक्षात ठेवलं पाहिजे की, शंभर लोकांना लागण झाली तर त्यापैकी दोन जणांचा मृत्यू होतो, असं आपण पूर्वी म्हणायचो. यामध्ये फार काही फरक पडलाय, असं मला वाटत नाही. पण बाधितांची संख्या एकदम जास्त झपाट्याने वाढल्याने मृत्य संख्याही जास्त आहे (ICMR Former Chief Raman Gangakhedkar on Corona).

प्रश्न : लान्सेटच्या अहवालात जूनमध्ये दर दिवशी 2300 लोकांचा मृत्यू होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याबाबत काय सांगाल?

उत्तर : हा अहवाल वेगळा आहे. हे मॉडेलिंग स्टडी आहे. या अशा स्टडिजमध्ये वेगवेगळे अंदाज बांधून रिपोर्ट तयार केला जातो. तो रिपोर्ट खराच ठरेल असं खात्रीलायकपणे सांगता येत नाही. आपण त्यातून एकच अर्थ काढू शकतो. याच गतीने मृत्यू दर सुरु राहीले. तर तेवढ्या आकड्याचे मृत्यूदरही होण्याची शक्यता आहे. मग मी आज स्वत:ला का बदलू नये? लोकांनी आज सर्व नियमांचं पालन केलं, कमी लोकांना कोरोनाची लागण झाली तर मृत्यूदर नक्कीच कमी होण्याची शक्यता आहे. जे आपल्या हातात आहे ते आपण करणं जास्त जरुरीचं आहे. पण एखादी संख्या वाचून पॅनिक होणं, हे कुठल्याही प्रकारे चांगलं नाही.

प्रश्न : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तिसऱ्या लाटेसाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. याबद्दल काय सांगाल?

उत्तर : मला वाटतं असं म्हणणं बरोबर नाही. पहिली-दुसरी लाटच आधी उतरु द्या. पहिल्या लाटी आधी ओसरल्यावरच तिसऱ्या लाटेसाठी तयारी करावी, असं आपण म्हणू शकतो. आपण सध्याच्या लाटेकडे विचारपूरक लक्ष द्यावं. ही लाट वाढतच चालली आहे. या लाटेला कसं थांबवायचं याचा प्रयत्न करावा. तिसरी लाटपण येऊ शकते हे म्हणणं म्हणजे मी तीस वर्षाचा आहे. मी 50 व्या वर्षी कॅन्सरने मरण्याची शक्यता आहे. म्हणून मी आतापासून तयारी केली पाहिजे. याला फार विशेष अर्थ नाही. सध्याच्या परिस्थितीत आपण काय करु शकतो, यावर विचार केला पाहिजे. दुसरी लाट नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

प्रश्न : कोरोनाची दुसरी लाट जितक्या वेगाने वाढली. तितक्याच वेगाने ती ओसरणार, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. यावर काय सांगाल?

उत्तर : लॉकडाऊन सारखे कडक निर्बंध राहिले तर जितक्या वेगाने कोरोनाची ही लाट वाढतेय तितक्या वेगाने ती कमी होऊ शकते. पण ते करण्याच्या परिस्थितीत आपण नाहीत. ते करुही नये. ते करणंही चांगलं राहणार नाही. यावेळेला आपण एक लक्ष ठेवलं पाहिजे. आपण सर्व नियमांचं पालन केलं पाहिजे. तसेच प्रत्येकाने लस घेतली तर नक्की ही लाट ओसरेल. ही लाट नैसर्गिकरित्या कशी ओसरते यात महत्त्व नाही. पण मी नियम पाळून ही लाट ओसरु शकतो हा आत्मविश्वास आपल्यात असला पाहिजे. सगळ्यांनी आपली वागणूक बदलायचा प्रयत्न केला तर नक्कीच आपण ही लाट आटोक्यात आणू शकतो.

प्रश्न : कोरोना खरंच हवेतून पसरतो का?

उत्तर : कोरोना प्रसाराचे दोन मार्ग आहेत हे आपण पहिल्या दिवसापासूनच सांगतोय. एक प्रकार हा ड्राप्लेट इन्फेक्शन म्हणून जातो. तर दुसरा प्रकार हा एरोसॉल म्हणून जातो. एरोसॉल प्रकार हा साधारणत: हॉस्पिटलमध्ये होण्याची शक्यता असते. एखाद्या रुग्णावर शस्त्रक्रिया करताना किंवा त्याला एन्सथेशिया देताना रुग्णाच्या घशात आपण जी नळी घालतो तेव्हा एरोसालद्वारे लागण होण्याती शक्यता आहे. एखादा रुग्ण शेजारी असला तो शिंकला तर त्याच्या शिंकेच्या थेंबामधूनच संसर्ग होण्याची दाट शक्यता असते. याबाबत हवेतून कोरोना संसर्ग होतो अशा ज्या स्टडी आहेत त्यावर फारसा विश्वास ठेवण्याची आवश्यकता नाही, असं त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

कोरोनाची लाट किती दिवस राहणार?, काय केले पाहिजे?; वाचा, तज्ज्ञ काय म्हणतात

कोरोनाचा प्रसार हवेतून वेगाने, मेडिकल जर्नल लॅन्सेटचा पुराव्यांसह दावा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.