एकनाथ शिंदे यांनी नकार दिला तर शिंदेंच्या शिवसेनेतून कोण होणार उपमुख्यमंत्री?

मुख्यमंत्री कोण होणार याचा सस्पेंस संपल्यानंतर आता शिवसेनेकडून उपमुख्यमंत्री कोण होणार याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. कारण एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री होणार नसल्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. त्याऐवजी त्यांच्या पक्षातून इतर कोणाला संधी दिली जाऊ शकते अशी चर्चा आहे. त्यामुळे आता शिंदे काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

एकनाथ शिंदे यांनी नकार दिला तर शिंदेंच्या शिवसेनेतून कोण होणार उपमुख्यमंत्री?
Follow us
| Updated on: Nov 28, 2024 | 10:34 PM

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची कोंडी जवळपास सुटली आहे. आज तिन्ही पक्षाचे महत्त्वाचे नेते दिल्लीत दाखल झाले असून गृहमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून एकनाथ शिंदे यांनी माघार घेतल्याने देवेंद्र फडणवीस यांचे नाव जवळपास निश्चित आहे. पण असं असलं तरी एकनाथ शिंदे यांच्यावर मोठी जबाबदारी येण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास, सार्वजनिक बांधकाम आणि जलसंपदा या तीन मोठ्या खात्यांची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.

काय असेल फॉर्म्युला

मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित झाले आहे. महाराष्ट्रात देखील एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असा फॉर्म्युला असल्याने उपमुख्यमंत्रीपदी शिंदे यांची नियुक्ती केली जाऊ शकते. भाजपची त्यासाठी तयारी आहे. पण एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री होणार नसल्याचं देखील बोललं जात आहे. कारण मुख्यमंत्री होऊन पुन्हा उपमुख्यमंत्री होणं योग्य नसल्याचं त्यांच्या पक्षातील नेत्यांचं म्हणणं आहे. पण एकनाथ शिंदे हे काय निर्णय घेतात त्याकडे ही सर्वांच लक्ष लागलं आहे. उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी एकनाथ शिंदे दुसऱ्या कोणाला देऊ शकतात अशी ही चर्चा आहे.

शिंदे गटातून उपमुख्यमंत्री कोण होणार?

एकनाथ शिंदे यांनीच उपमुख्यमंत्री व्हावं असं पक्षातील काही आमदारांची मागणी आहे. शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं असं त्यांचं मत आहे. पण शेवट निर्णय एकनाथ शिंदे हेच घेणार आहेत. काल श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्री करण्यात यावं अशी शिंदेंची मागणी असल्याची देखील चर्चा सुरु झाली होती. पण त्यावर कोणीही काहीही प्रतिक्रिया दिली नाही. जर शिंदे उपमुख्यमंत्री होणार नसतील तर त्यांच्याकडे दिपक केसरकर, दादा भुसे आणि भरत गोगावले हे वरिष्ठ नेत्यांचे पर्याय देखील आहेत. दुसरीकडे एकनाथ शिंदे हे दिल्लीला शंभुराज देसाई आणि उदय सामंत यांना सोबत घेऊन आले आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाची ही चर्चा आहे.

जळगाव ग्रामीण मतदारसंघात शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांचे चक्क भावी उपमुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले आहेत. जळगाव ग्रामीण मतदारसंघात मंत्री गुलाबराव पाटील यांचे भावी उपमुख्यमंत्री असे बॅनर लागले. त्यामुळे जळगाव जिल्ह्याचे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. विधानसभेत विजयाबद्दल अभिनंदनाच्या फलकावर मंत्री गुलाबराव पाटील यांचा भावी उपमुख्यमंत्री म्हणून उल्लेख आहे.

महायुतीच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी येत्या 2-3 दिवसात होण्याची शक्यता आहे. पण अशी देखील माहिती आहे की, संभाव्य मंत्रिमंडळातून अनेक ज्येष्ठ नेत्यांना वगळले जाऊ शकते.

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.