आम्हाला अजून व्हीप प्राप्त झालेला नाही, त्यांनी व्हीप बजावला तर… ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू यांचा इशारा कुणाला ?

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिवसेनेकडून व्हीप जारी करण्यात आला आहे. त्यावर ठाकरे गटाने प्रतिक्रिया देत इशारा दिला आहे. त्यामुळे नवा वाद यावरून उभा राहू शकतो.

आम्हाला अजून व्हीप प्राप्त झालेला नाही, त्यांनी व्हीप बजावला तर... ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू यांचा इशारा कुणाला ?
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Feb 27, 2023 | 11:16 AM

मुंबई : आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. त्याच दरम्यान शिवसेनेकडून ( Shivsena ) ठाकरे गटाच्या आमदारांना व्हीप जारी करण्यात आला आहे. यामध्ये व्हीप पाळला नाही तर दोन आठवड्यांनी कारवाईचा विचार करू असे शिवसेनेचे प्रतोद भरत गोगवले ( Bharat Gogavale )  यांनी म्हंटलं होतं त्यावर ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू ( Sunil Prabhu ) यांनी प्रतिक्रिया देत इशारा दिला आहे. आम्हाला अद्याप पर्यन्त व्हीप मिळालेला नाही. त्यांनी न्यायालयात सांगितले आहे की आम्ही व्हीप बजावणार नाही. न्यायालयाच्या नियमांचे उल्लंघन होईल असेही सुनील प्रभू यांनी म्हंटले असून न्यायालयात जाण्याची आमची तयारी असल्याचेही प्रभू यांनी म्हंटले आहे.

अधिवेशनाला सर्वांनी हजर राहावं हा व्हीप आम्ही काढला आहे. न्यायालयात आम्ही सांगितलं होतं की कारवाई करणार नाही पण व्हीप काढला आहे. आम्ही कारवाई करणार नाही पण संगल्याने तिथे हजर राहायचे आहे असं शिवसेना प्रतोद गोगावले यांनी म्हंटलं होतं.

तर दुसरीकडे त्यावर पलटवार करत असतांना ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू यांनी त्यांचा व्हीप आम्हाला लागू होणार नाही. 55 आमदारांना त्यांनी व्हीप जाहीर केला असला तरी तो आम्हाला अजून प्राप्त झालेला नाही.

हे सुद्धा वाचा

सुप्रीम कोर्टासमोर त्यांनी सांगितले आहे की व्हीप बजावणार नाही. मग त्यांनी व्हीप जर काढला तर आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ, याशिवाय उपस्थितीबाबत आमच्या आमदारांना आम्ही बाजावू म्हणत सुनील प्रभू यांनी शिवसेना ठाकरे गटाची बाजू मांडली आहे.

एकूणच अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्याच्या पूर्वीच ठाकरे गट आणि शिवसेना म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्या पक्षात आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहे. त्यामुळे एकीकडे सुप्रीम कोर्टात सत्तासंघर्षाची सुनावणी सुरू असतांना दुसरीकडे हे अधिवेशन पार पडत आहे.

शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळाल्यानंतर पहिल्यांदाच अधिवेशन पार पडणार आहे. यामध्ये 13 विधेयके मांडली जाणार आहे. विविध मुद्यांवर राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन गाजणार आहे.

याशिवाय नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणानंतर हे अधिवेशन सुरू होणार आहे. त्यामुळे बऱ्याच नवनवीन घडामोडी घडल्यानंतर हे अधिवेशन होत असतांना पहिल्यांदाच शिंदे आणि ठाकरे यांच्यातील आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असल्याचे दिसून येत आहे.

अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच शिवसेना प्रतोद भरत गोगावले आणि ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांच्यात आरोप प्रत्यारोप बघायला इलात आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.