Monsoon : राज्यात या ठिकाणी पुढील पाच दिवस अतिवृष्टीचा इशारा

Weather Update : महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. जळगावात देखील मुसळधार पाऊस होत आहे. पुढील पाच दिवस कोणत्या भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे जाणून घ्या.

Monsoon : राज्यात या ठिकाणी पुढील पाच दिवस अतिवृष्टीचा इशारा
rain fall in next five days
Follow us
| Updated on: Jun 28, 2024 | 7:07 PM

Rain Alert : मान्सून आता राजधानी दिल्लीत दाखल झाला आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे. अनेक सखल भागात पाणी साचले आहे. हवामान खात्याने काही राज्यांमध्ये पुढील चार ते पाच दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे लोकांनीही सावध राहण्याचं आवाहन करण्यात आलंय. मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यात देखील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो. मुंबई आणि ठाण्यात देखील मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. विदर्भात देखील तुरळक पावसाचा हवामान खात्याचा अंदाज आहे. मुंबई आणि ठाण्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय.

इतर राज्यांमध्ये काय आहे परिस्थिती

पुढील दोन ते चार दिवस मध्य भारतातील राज्यांमध्ये आणि पुढील पाच दिवस ईशान्य भारतात जोरदार पाऊस पडेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे. गेल्या २४ तासात दिल्ली, छत्तीसगड, पश्चिम मध्य प्रदेश, ओडिशा, कोकण, गोवा, विदर्भ, हिमाचल प्रदेश, हरियाणा, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, पंजाब, राजस्थान, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, मणिपूर, सर्व पश्चिम बंगाल, सिक्कीम, मध्य महाराष्ट्र, केरळ, पूर्व मध्य प्रदेश, किनारी आंध्र प्रदेश, किनारपट्टी कर्नाटक, तामिळनाडू येथे मुसळधार पाऊस झालाय.

मान्सून आता पूर्व राजस्थान, हरियाणा, दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार, पूर्व उत्तर प्रदेश, उत्तराखंडमध्ये पोहोचला आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत मान्सून जम्मू, चंदीगड, पंजाब, राजस्थान, हिमाचल प्रदेशच्या उर्वरित भागांमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे.

केरळ, लक्षद्वीप, किनारी कर्नाटक, विदर्भ, छत्तीसगड, कोकण, गोवा, गुजरात, मध्य महाराष्ट्र, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, किनारी आंध्र प्रदेश, रायलसीमा, तेलंगणा, उत्तर आणि दक्षिण कर्नाटकात पुढील पाच दिवसात जोरदार पाऊस होणार आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, हरियाणा, चंदीगड, दिल्लीमध्ये 29 जून ते 1 जुलै, उत्तर प्रदेशात 28 ते 30 जून, पूर्व राजस्थानमध्ये 29 जून ते 2 जुलै आणि मध्य प्रदेशमध्ये 28 ते 29 जून दरम्यान आणि 28 जूनपासून ओडिशामध्ये. 30 जून दरम्यान मुसळधार पाऊस पडणार आहे.

Non Stop LIVE Update
'या' 8 ठिकाणावर पिकनिकला जाताय? मग ग्रुपने एन्जॉय करता येणार नाही कारण
'या' 8 ठिकाणावर पिकनिकला जाताय? मग ग्रुपने एन्जॉय करता येणार नाही कारण.
'या' महिन्यात महाराष्ट्र चिंब भिजणार, तुमच्या जिल्ह्यात कसा पडणार पाऊस
'या' महिन्यात महाराष्ट्र चिंब भिजणार, तुमच्या जिल्ह्यात कसा पडणार पाऊस.
अंबादास दानवेंच्या 'त्या' शिवीगाळच्या वक्तव्यावरून ठाकरेंकडून माफी
अंबादास दानवेंच्या 'त्या' शिवीगाळच्या वक्तव्यावरून ठाकरेंकडून माफी.
विधान परिषदेच्या 11 जागा अन् 12 जण रिंगणात, कोणाची मतं फुटणार?
विधान परिषदेच्या 11 जागा अन् 12 जण रिंगणात, कोणाची मतं फुटणार?.
लाडकी बहीण योजना, सरकारनं बदलला निर्णय, या कागदपत्रांशिवाय मिळणार 1500
लाडकी बहीण योजना, सरकारनं बदलला निर्णय, या कागदपत्रांशिवाय मिळणार 1500.
संसदेत मोदींना बोलणंही अवघड, विरोधकांचा एकच गोंधळ; सभागृहात काय घडलं?
संसदेत मोदींना बोलणंही अवघड, विरोधकांचा एकच गोंधळ; सभागृहात काय घडलं?.
'जयंतराव तुम्ही नकली वाघांसोबत असली... ', मुख्यमंत्र्यांची थेट ऑफर
'जयंतराव तुम्ही नकली वाघांसोबत असली... ', मुख्यमंत्र्यांची थेट ऑफर.
दिवे घाटातील माऊलींच्या पालखीचं विहंगम दृश्य; ड्रोनमध्ये कैद नजारा
दिवे घाटातील माऊलींच्या पालखीचं विहंगम दृश्य; ड्रोनमध्ये कैद नजारा.
तुमच्याकडे हे कागदपत्रं आहेत का? तरच मिळणार 'लाडकी बहीण योजने'चा लाभ
तुमच्याकडे हे कागदपत्रं आहेत का? तरच मिळणार 'लाडकी बहीण योजने'चा लाभ.
मी मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण...भावना गवळी उमेदवारी मिळताच गहिवरल्या
मी मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण...भावना गवळी उमेदवारी मिळताच गहिवरल्या.