IMD Weather Forecast : जाणून घ्या महाराष्ट्रातील पावसाचे सर्व अपडेट्स, शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी
IMD Weather Forecast : राज्यात पुढील पाच दिवस अवकाळी पावसाचा अंदाज आहे. मंगळवार आणि बुधवारी गारपीट होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे आणि ओडिशा-तमिळनाडूपर्यंत हवेची द्रोणीय स्थितीमुळे वातावरण ढगाळ आहे. 40 ते 60 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा इशारा. विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडण्याचा अंदाज.

महाराष्ट्रात अवकाळी पाऊस धुमाकूळ घालण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होऊ शकतं. राज्यभरात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच राज्यभरात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने अवकाळी पावसाबाबत काही जिल्ह्यांना ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी केला आहे. हा अवकाळी पाऊस विजांचा कडकडाट, ढगांच्या गडगडाटासह कोसळणार असल्याचा अंदाज आहे. यावेळी वादळी वारे देखील वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिकांचं मोठं नुकसान होण्याची भीती आहे. यामुळे शेतकरी चिंतेत पडले आहेत. हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठीचे अलर्ट जारी केले आहेत.
यात ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी 1 आणि 2 तारखेला पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला 1 ते 3 एप्रिलपर्यंत पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या काळात वाऱ्याचा वेग हा 30 ते 40 किमी प्रतितास असा असण्याची शक्यता आहे, तर धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांना उद्यासाठी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सातारा जिल्ह्याला उद्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे
नाशिक
जिल्ह्यावर ‘अवकाळी’ पावसाचे संकट आहे. हवामान विभागाकडून नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील काही भागांना पुढील २-३ दिवस अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. अवकाळी आणि गारपीट झाल्यास उत्पादनावर होऊ शकतो विपरीत परिणाम. कांदा, द्राक्षे, गहू, हरभरा आदी पिकांना फटका बसण्याची शक्यता. नुकसान टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे हवामान खात्याचे आवाहन.
कोकण
चिपळूणला मध्यरात्रीपासून पावसाने झोडपले. रात्रभर अवकाळी पावसाचा जोर. चिपळूणातील सर्व रस्ते झाले ओले. अचानक आलेल्या पावसामुळे आंबा बागायतदारांची चिंता वाढली. आंबा पिकांवर अवकाळी पावसाचा होणार परिणाम.
सोलापूर
सोलापूर शहर आणि जिल्ह्यात आज हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. त्याचबरोबर बुधवारी यलो अलर्ट जाहीर करण्यात आलाय. मात्र पावसाच्या अंदाजामुळे द्राक्ष आणि आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. ऐन पीक हातातोंडांशी आलेले असल्याने पावसाच्या अंदाज वर्तवल्याने शेतकरी चिंताग्रस्त झालायय
पुणे
शहरात आज पावसाची शक्यता आहे. शहर आणि जिल्ह्यात आज विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. शहरात मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे उकाडा वाढला असून दररोज दुपार नंतर ढग भरून येत असल्याने पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मराठवाडा
मराठवाड्यामध्ये चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे वातावरणात बदल होत आहेत. वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे.
नाशिक, जळगाव, संभाजीनगर, पुणे, जालना, अहिल्यानगरमध्ये हवामान विभागाचा गारपिटीचा इशारा.
जालना
जालना तालुक्यातील रामनगर, हिवरा रोशनगाव,उटवद, खोडेपुरी, डुकरी पिंपरी, आणि इतर आसपासच्या गावात मध्यरात्री पावसाने हजेरी लावली. यावेळी वादळी वारा आणि विजाही चमकत होत्या. यामध्ये या गावातील शेतकऱ्यांचं मका पिकांचं काही प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान हवामान विभागाकडून पुढचे दोन दिवस जालना जिल्ह्याला येलो अलर्ट जारी करण्यात आला असून दोन दिवसापासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आता चिंतेत आहेत.
ठाणे
ठाण्यात ढगाळ वातावरणासह हवेत गारवा. हलक्या सरी बरसण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. ठाण्यासह सात जिल्ह्यात वादळीवाऱ्यासह मुसळधार पावसाचा आणि हलक्या सरीचा इशारा हवामान खात्याने वर्तव्यविला आहे. सकाळपासून ठाण्यामध्ये देखील ढगाळ वातावरण आणि हवेत गारवा दिसून येत आहे. गेल्या काही दिवसापासून 35 डिग्री तापमान पाहायला मिळत होते.
कल्याण-डोंबिवली
कल्याण-डोंबिवलीत सकाळपासून ढगाळ वातावरण पहायला मिळत आहे. उष्णतेचा तीव्र लाट असल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले होते. आज सकाळपासून ढगाळ वातावरण असल्याने काहीसा दिलासा मिळणार आहे.