Video Nagpur Fire | नागपुरात आरा मशीनला भीषण आग, आग विझविण्यासाठी अग्निशमन विभागाच्या गाड्या रवाना
नागपुरातील लकडगंड परिसरात आरामशीनला आग लागली. हरीहर मंदिराजवळ आरामशीनला आग लागली. ही आग सकाळी सातच्या सुमारास लागली. अग्निशमन विभागाच्या चार गाड्या रवाना झाल्यात. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
नागपुरातील लकडगंड परिसरात आरा मशीनला आग लागली. हरीहर मंदिराजवळ (Harihar temple) आरा मशीनला आग लागली. ही आग सकाळी सातच्या सुमारास लागली. अग्निशमन (Firefighting) विभागाच्या चार गाड्या रवाना झाल्यात. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आरा मशीन असल्यान लाकडं मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळं आगीचा भडका उडाला. उन्हाचा कडाका चांगलाच वाढला. अशात कालही यवतमाळ, वाशिम व अकोला या तीन ठिकाणी आगी लागल्या होत्या. आगीची विदर्भातील कालपासूनची ही चौथी घटना आहे.
लाकडाचं काम मोठ्या प्रमाणात
लाकडाच्या वखारीला ही आग लागली. ही आग अजूनही धुमसते आहे. अग्निशमन दल आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करते. अग्निशमन दलाचे जवान ही आग विझविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. या परिसरात लाकडाचं मोठ्या प्रमाणात काम होतं. लकडगंज हे नावचं लाकुडकाम या भागात होत असल्यानं ठेवण्यात आलं आहे.
पाहा व्हिडीओ
नागपूरच्या लकडगंज येथील आरा मशीनला आग. pic.twitter.com/OfBNAzPrBd
— Govind Hatwar (@GovindHatwar) April 7, 2022
आगीमुळं मोठं नुकसान
लाकडांचा परिसर असल्यानं जास्त धोका निर्माण झाला आहे. शार्ट सर्किटमुळं आग लागल्याची माहिती मिळते. कोट्यवधी रुपयांचं फर्निचर जळून खाक झाले. नागपूर महापालिकेचा फायर ब्रिगेट विभागाकडून ही आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ज्याठिकाणी ही आग लागली त्याच्या शेजारीच मोठ्या प्रमाणात लाकड ठेवलेली आहेत. त्यामुळं या आगीची व्याप्ती वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या आगीमुळं मोठं नुकसान झाल आहे. सकाळी सातच्या सुमारात ही आग लागली, अशी माहिती फायर ब्रिगेड विभागाकडून देण्यात आली.
परिसरात शंभरच्या वर आरा मशीन
परिसरात शंभरपेक्षा जास्त आरा मशीन आहेत. याच भागात ही आग लागली आहे. ही आग भडकू नये, यासाठी फायर ब्रिगेडचे जवान कामाला लागले आहेत. मोठ्या संख्येनं लोकं याठिकाणी आले आहेत. आग लागली त्या परिसरातील फर्निचर बाहेर काढले जात आहे. आरा मशीनचा परिसर असल्यानं आग पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.