AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाची शक्यता, राज्यातील कोण-कोणत्या जिल्ह्यांना यलो अलर्ट ?

विदर्भातील सात जिल्ह्यांना यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. येत्या काही दिवसांत या भागांमध्ये मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. कोण-कोणत्या भागात पडेल मुसळधार पाऊस ?

मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाची शक्यता, राज्यातील कोण-कोणत्या जिल्ह्यांना यलो अलर्ट ?
राज्यातील कोण-कोणत्या जिल्ह्यांना यलो अलर्ट ?
| Updated on: Apr 28, 2025 | 9:06 AM
Share

ऊन्हाळा सुरू असला तरी अवकाळी पावसाचे संकट राज्यावर अजूनही कायम आहेच. काही दिवासंपासून राज्यात विविध भागात पावसाने हजेरी लावली असून येत्या काळातही पावसाचा अंदाज आहे. विदर्भातील काही भागांतील कमाल तापमानाचा पारा काहीसा उतरला असून, सोमवारी अमरावती, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या भागांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट, यासह ताशी 50 ते 60 कि.मी. वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सात जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

दरम्यान मध्य महाराष्ट्रातील हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील काही भागांसह मराठवाड्यातील कमाल तापमानात 1 ते 2 अंश सेल्सिअसने घट झाली. मध्य महाराष्ट्रात कोल्हापूर, नाशिक, सांगली, सातारा तसेच सोलापूरसह विदर्भात नागपूर, गोंदिया, वर्धा आणि यवतमाळ भागातील तापमानाचा पारा उतरला आहे.

मुंबई करांवर पाणी कपातीचे संकट अटळ

मुंबई करांवर पाणी कपातीचे संकट अटळ असून अवघा 26 टक्के पाणासाठी आहे. महिन्याभरात 16 टक्के पाण्याची घट झाली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांत गेल्या महिनाभरात पाणीसाठ्यात झपाट्याने बदल झाला आहे. महिनाभरात 16 टक्के घट झाल्याने आता तलावांतील साठा फक्त 26 टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे मुंबईकरांवर पाणीकपातीचे संकट ओढावू शकते.

मुंबईला दररोज सुमारे 3 हजार 950 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होतो. महिनाभरापूर्वी पाणीसाठा 6 लाखत 16 हजार दशलक्ष लिटर होता. तो आता 3 लाख 88 हजार दशलक्ष लिटरपर्यंत खाली आला असून 16 टक्के घट झाली आहे. त्यामुळे 14 मे पर्यंत सातही तलावातील पाणीसाठा 10 टक्केवर येईल, असे जल अभियंता विभागाकडून सांगण्यात येत आहे. पाण्याची वाढती घट लक्षात घेता लवकरच साठ्यासंदर्भात आढावा बैठक घेऊन पाणी कपात करायची असेल तर ती कधीपासून याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे.

28 एप्रिल ते 1 मे पर्यंत या राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

दरम्यान उष्णतेच्या लाटेने त्रस्त उत्तर प्रदेशातील लोकांसाठी हवामान विभागाने दिलासादायक बातमी दिली आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, 28 एप्रिल ते 1 मे दरम्यान उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. या काळात, गारपीट आणि जोरदार वाऱ्याचा इशारा देखील जारी करण्यात आला आहे. या बदलामुळे लोकांना उष्णतेपासून दिलासा मिळू शकतो.

पश्चिमी विक्षोभाचा परिणाम:

हवामान खात्याच्या माहितीनुसार, , पश्चिमी विक्षोभाच्या प्रभावामुळे 28 एप्रिलपासून उत्तर प्रदेशातील हवामान बदलणार आहे. या काळात, अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडेल आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहू शकतात. यासोबतच मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.

28 एप्रिल ते 1 मे हवामानात होणार बदल

हवामान विभागाच्या सांगणायानुसार, या काळात राज्याचे किमान तापमान 2-3 अंश सेल्सिअसने वाढू शकते. पश्चिम उत्तर प्रदेशात 29 एप्रिल ते 1 मे दरम्यान वादळ आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि येथे जोरदार वारेही वाहण्याची शक्यता आहे.

या जिल्ह्यात होणार पाऊस :

हवामान खात्याने उत्तर प्रदेशातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचे संकेत दिले आहेत:

बहराइच: येथे 28 ते 30 एप्रिल दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे.

आझमगड: 28 एप्रिल रोजी जोरदार वारे आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे.

अयोध्या: 28 एप्रिल रोजी पाऊस पडू शकतो.

बलिया आणि देवरिया: 28 एप्रिल रोजी पाऊस आणि जोरदार वाऱ्यांचा इशारा आहे.

पूर्व उत्तर प्रदेश: 28 ते 29 एप्रिल दरम्यान हलका ते मध्यम पाऊस, जोरदार वारे आणि गडगडाटी वादळ अपेक्षित आहे.

उष्णेतेपासून मिळणार दिलासा :

एकूणच, 28 एप्रिल ते 1 मे दरम्यान, उत्तर प्रदेशच्या विविध भागात हवामानात बदल होईल आणि लोकांना उष्णतेपासून आराम मिळेल. लोकांनी गारपीट आणि जोरदार वाऱ्यांचा सामना करण्यासाठी तयार राहावे, तर पावसामुळे हवामान थंड होईल आणि उष्णतेपासून आराम मिळेल.

निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार.
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं.
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!.
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?.
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा
BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा.
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.