Video : कोस्ट गार्डच्या रेस्क्यूचा थरार; अलिबागच्या समुद्रात अडकलेल्या पाच जणांची सुखरूप सुटका
अलिबाग (Alibaug) तालुक्यातील नवगावच्या खडकात अडकलेल्या बोटीमधून पाच कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका (Coast Guard Rescue) करण्यात आली आहे.
रायगड : अलिबाग (Alibaug) तालुक्यातील नवगावच्या खडकात अडकलेल्या बोटीमधून पाच कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका (Coast Guard Rescue) करण्यात आली आहे. भारतीय तटरक्षक दलाच्या (Indian Coast Guard) जवानांनी या बोटीवर अडकलेल्या कर्मचाऱ्यांची सुटका केली. अलिबाग तालुक्यातील नवगावच्या खडकात एक फिलिपाईन्सची बोट अडकली होती. या बोटीवर पाच कर्मचारी होते. बोट अडकल्याने कर्मचारी या बोटीवर अडकून पडले. घटनेची माहिती मिळताच तटरक्षक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. तटरक्षक दलाच्या जवानांनी स्थानिक प्रशासनाच्या समन्वयातून हेलिकॉप्टरच्या मदतीने या बोटीवर अडकलेल्या कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर या कर्मचाऱ्यांना मुंबईमध्ये नेण्यात आले आहे. घटनेबाबत अधिक माहिती अशी की, समुद्रातील वादळाचा वेग वाढला. याचदरम्यान बोटीच्या इंजिनमध्ये बिघाड झाला आणि ही बोट खडकाला आदळली. बोट खडकाला आदळल्यामुळे तिला छिद्र पडले. या छिद्रामधून पाणी आत जाऊ लागले, त्यानंतर बोटीवर अडकलेल्या कर्मचाऱ्यांकडून तटरक्षक दलाला संदेश पाठवण्यात आला.
व्हिडीओमध्ये नेमकं काय?
आपण या व्हिडीओमध्ये पाहू शकतो. बोटीत काही जण अडकले आहेत. ही फिलिपाईन्सची बोट आहे. ही बोट खडकात अडकल्याने या कर्मचाऱ्यांना बोटीतून बाहेर पडणे अशक्य झाले. त्यानंतर तटरक्षक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. तटरक्षक दलाच्या जवानांनी स्थानिक प्रशासनाच्या समन्वयातून हेलिकॉप्टरच्या मदतीने या बोटीवर अडकलेल्या कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढले. या बोटीमध्ये एकूण पाच कर्माचारी होते. कर्मचाऱ्यांची सुटका केल्यानंतर त्यांना मुंबईला नेण्यात आले आहे.
#WATCH | Braving rough seas & strong wind conditions, Indian Coast Guard ship Agrim & helicopter in a jt op rescued 5 crew incl foreigners from a distressed yacht Poorima at Mandwa off Alibaug in the early morning today. Crew safe & shifted to hospital
(Video:Indian Coast Guard) pic.twitter.com/ZGzqLNJc6W
— ANI (@ANI) August 12, 2022
हवामान खात्याकडून इशारा
पवसाळ्याचे दिवस आहेत. सध्या राज्यभरात मुसळधार पाऊस पडत आहे. दोन दिवसांपूर्वी राज्यातील काही भागांना हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला होता. या सर्व पार्श्वभूमीवर मच्छिमारांनी खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असा इशारा देखील हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.