‘मी असं बोललोच नाही’, तृप्ती देसाईंच्या कायदेशीर नोटीसला इंदोरीकर महाराजांचं उत्तर

भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांनी कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांना कायदेशीर नोटीस पाठवली (Indorikar Maharaj on Trupti Desai notice)

'मी असं बोललोच नाही', तृप्ती देसाईंच्या कायदेशीर नोटीसला इंदोरीकर महाराजांचं उत्तर
Follow us
| Updated on: Jul 07, 2020 | 1:57 PM

पुणे : महिलांचा अपमान केल्याप्रकरणी भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांनी प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांना कायदेशीर नोटीस पाठवली (Indorikar Maharaj on Trupti Desai notice). यावर उत्तर देताना इंदोरीकर महाराज यांनी आपण असं बोललोच नसल्याचा दावा केला आहे. देसाई यांनी इंदोरीकर महाराज यांच्या समर्थकांकडून अपमानास्पद वागणूक आणि धमक्या दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत त्यांनी इंदोरीकर महाराज यांना थेट कायदेशी नोटीस बजावली. यानंतर इंदोरीकर महाराज आणि तृप्ती देसाई यांचे समर्थक आमनेसामने आले आहेत.

निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांनी जाहीर कीर्तनातून अंधश्रद्धा पसरवणारे वादग्रस्त वकतव्य केले होते. इंदोरीकर महाराज महिलांविषयी नेहमीच आक्षेपार्ह वक्तव्ये करत असतात. महिलांना जाहिररीत्या अपमानीत करत असतात, असा आरोप तृप्ती देसाई यांनी केला होता. याच मुद्द्यावरुन सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी अॅड मिलिंद दत्तात्रय पवार यांच्यामार्फत 26 फेब्रुवारी रोजी इंदोरीकरांना कायदेशीर नोटीस बजावली. अॅड मिलिंद पवार यांनी पाठविलेल्या कायदेशीर नोटिशीला निवृत्ती महाराज देशमुख यांनीही त्यांचे वकिल अॅड पवार यांच्यामार्फत कायदेशीर उत्तर दिले.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज! 

निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी आपल्या उत्तरात म्हटले, “आपले कोणी समर्थक नाही. निवृत्त महाराज तृप्ती देसाई यांना त्रास देणाऱ्या कुठल्याही समर्थकांना ओळखत नाही. काही अज्ञात लोकांनी काही उद्योग केले असतील, तर त्याला निवृत्ती महाराज जबाबदार नाही. निवृत्ती महाराज देशमुख यांनी आजपर्यंत कधीच कीर्तनातून महिलांना अपमानित होईल किंवा महिलांचा अनादर होईल असं वकव्य केलेलं नाही. तसेच अंधश्रद्धा पसरेल असंही वक्तव्य केलेलं नाही.”

“असं कोणतंही आक्षेपार्ह वक्तव्य केलेलं नसल्याने इंदोरीकर महाराजांनी महिलांची जाहीर माफी मागावी असं वाटत नाही किंवा माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही, असंही या पत्रात म्हटलं आहे. अॅड. मिलिंद दत्तात्रय पवार यांना निवृत्ती महाराज देशमुख यांनी त्यांच्या सहीनीशी रजिस्टर पत्राद्वारे उत्तर पाठवले आहे.

संबंधित बातम्या

माझे सध्या वाईट दिवस, चांगलं काम करताना एवढा त्रास होतो : इंदुरीकर महाराज  

राज्य सरकारच्या अकलेची कीव, भाजप आमदाराचा इंदुरीकर महाराजांना पाठिंबा 

आमचं घरच बसल्यासारखं झालं, मुलं शाळेत जाईनात, आख्खं घर आऊट झालं, इंदुरीकर महाराज उद्विग्न  

आता आपली कपॅसिटी संपली, उद्या-परवाचं बघून फेटा ठेवणार, शेती करणार : इंदुरीकर महाराज

Indorikar Maharaj on Trupti Desai notice

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.