काेराेना काळातही ऑनलाईन याेगा घेणाऱ्या दीपा वानखडे, देशासह विदेशातही प्रशिक्षण

गेल्या वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच प्रशिक्षण केंद्र बंद करण्यात आले. त्यामुळे दीपा वानखेडे यांनी ऑनलाईन प्रशिक्षण सुरू केले आहे.

काेराेना काळातही ऑनलाईन याेगा घेणाऱ्या दीपा वानखडे, देशासह विदेशातही प्रशिक्षण
deepa wankhede
Follow us
| Updated on: Jun 21, 2021 | 4:13 PM

वाशिम : आज 21 जून म्हणजेच जागतिक योगा दिवस म्हणून जगभरात साजरा केला जातो. वाशिम शहरातील दीपा वानखेडे या योगाच प्रशिक्षण देतात. मात्र गेल्या वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच प्रशिक्षण केंद्र बंद करण्यात आले. त्यामुळे दीपा वानखेडे यांनी ऑनलाईन प्रशिक्षण सुरू केले आहे. केवळ देशभरातच नव्हे तर विदेशातही त्या ऑनलाईन योगाचे प्रशिक्षण देतात. जपान, कॅलिफोर्निया, यूएस, न्युजर्सी यासह चार देशातील नागरिक या ऑनलाईन पध्दतीने योगाचे प्रशिक्षण घेत असल्याची माहिती योगा शिक्षिका दीपा वानखेडे यांनी दिली. (International Yoga day 2021 online yoga teacher deepa Wankhede learn yoga during corona pandemic)

सोशल मीडियाद्वारे योग प्राणायामाचे धडे

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. या काळात कोणीही घराबाहेर पडत नव्हते. अशातच वेळेचा सदुपयोग व्हावा यासाठी महिला पतंजली योग समितीच्या जिल्हा प्रभारी दीपा रवी वानखडे यांनी रोगप्रतिकारशक्ती वाढावी याकरिता सोशल मीडियाद्वारे योग प्राणायामाचे धडे नागरिकांना दिले. त्यांचे हे कार्य आजही अविरत सुरु आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपद्वारे योगाची माहिती 

कोरोना काळात योग करुन प्रतिकारशक्ती वाढविणे, आयुर्वेदाचा आधार घेऊन शरीराचे, इंद्रियाचे, मनाच्या सर्व प्रकारच्या रोग व्याधीपासून रक्षण होते. तसेच वातावरण, पर्यावरण शुध्दी करुन स्वच्छतेचा संदेश पोहोचविणे या अनुषंगाने वाशिम येथील पतंजली योग समितीच्या पुढाकाराने दीपा वानखडे यांनी उपक्रम सुरु केला आहे.

पतंजली योग साधना या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपद्वारे त्या दररोज व्हिडीओव्दारे योगा, प्राणायमाचे प्रकार, त्याबाबत इत्यंभूत माहिती देतात. त्याचे फायदे त्यांच्या ग्रुप सदस्यांना पटवून दिले आहे. त्यांच्या कार्याची विविध सामाजिक संघटनांनीही दखल घेतली.

अनेक पुरस्काराने सन्मानित

योगतज्ज्ञ दीपा यांच्या कार्याची दखल घेत त्यांना 3 मार्चला बेटी बचाओ फांऊडेशनतर्फे ‘राष्ट्रीय भारत भूषण पुरस्कार’ देण्यात आला. तर 2019 मध्ये व्हाईट स्पेस संस्था, पुणे यांच्याकडून नि:शुल्क योगसेवेसाठी तर 2020 मध्ये कवी डॉ. विठ्ठल वाघ यांच्या हस्ते ‘युथ आयकॉन पुरस्कार’ यांसह विविध सामाजिक संघटनांचे पुरस्कार मिळाले आहेत. विशेष म्हणजे आयुष मंत्रालय, भारत सरकारच्यावतीने घेण्यात आलेल्या जागतिक पातळीवरील योग शिक्षक आणि योग मूल्यांकन या परीक्षाही त्या उत्तीर्ण झाल्या आहेत.(International Yoga day 2021 online yoga teacher deepa Wankhede learn yoga during corona pandemic)

संबंधित बातम्या : 

International Yoga Day : योग दिनानिमित्त अमृता खानविलकरचं खास योगा सेशन, पाहा फोटो

International Yoga Day 2021 : राज्यभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा, पाहा फोटो

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.