भरधाव डंपारने बाप-लेकाला संपवले; सांगलीतील आष्टा मार्गावर भीषण अपघात
सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर आष्टा मार्गावर बेदरकार भरधाव डंपरने मोटरसायकलला दिलेल्या धडकेत पिता पुत्र जागीच ठार झाले आहेत. तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे.
सांगलीः सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर आष्टा मार्गावर (Islampur Ashta Road) बेदरकार भरधाव डंपरने मोटरसायकलला (Dumper Motorcycle) दिलेल्या धडकेत पिता पुत्र जागीच ठार झाले आहेत. तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे. या अपघातात (Accident) पितापुत्रांची डोकी धडापासून वेगळी झाली होती. अंकुश शिवाजी साळुंखे (वय 40), आदित्य अंकुश साळुंखे (वय 14) अशी मृत पिता पुत्रांची नावे आहेत. तर सोनाली अंकुश साळुंखे (वय 34) असे जखमींची नावं आहेत. या अपघातानंतर डंपर चालकाने डंपर तसाच पुढे पळवून घेऊन गेल्याने पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
आष्टा इस्लामपूर रस्त्यावर आज हा भीषण अपघात झाला. पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून मदतकार्य केले. या अपघातात मृत झालेले अंकुश हे पत्नी सोनाली, मुलगा आदित्य यांना घेऊन आष्ट्याकडून इस्लामपूरच्या दिशेने निघाले होते. आहिरवाडी फाटा वळणावर आले असताना इस्लामपूरकडून आष्ट्याकडे निघालेल्या भरधाव डंपरने बाजू बदलून मोटरसायकलला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की या धडकेत अंकुश व आदित्य हे दोघेही जागीच ठार झाले. तर सोनाली या गंभीर जखमी झाल्या आहेत.
अपघातानंतर प्रचंड गर्दी
या अपघातानंतर डंपर चालकाने डंपर न थांबवता बेदरकापणे आष्ट्याच्या दिशेने घेऊन पळवून निघून गेला. अपघातानंतर घटनास्थळी प्रवाशांची गर्दी झाली होती. घटनास्थळीचे चित्र पाहून अनेक लोक अचंबित होते. दुचाकीला दिलेल्या धडकेनंतर आदित्याच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला होता. तर अंकुश यांच्या डोके धडा वेगळे झाले होते. शिर धडावेगळे झाल्यानंतर घटनास्थळी या डोक्याचा शोध घेण्यात येत होता. डंपरमध्ये अडकल्याने धडावेगळे डोके झाले होते. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांनी देण्यात आल्यानंतर पोलीस डंपरचा शोध घेत होते.
एकाच कुटुंबातील दोघे जण ठार
या अपघातात पिता पुत्रांचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली. एकाच कुटंबातील दोन व्यक्तिंची निधन झाल्याने कुटुंबियांना प्रचंड मोठा धक्का बसला आहे. डंपर चालकाने बेदरकारपणे डंपर चालवल्याने हा अपघात झाला आहे. त्यामुळे डंपर चालकाला तात्काळ पकडण्याची मागणी केली गेली आहे.
संबंधित बातम्या
राज ठाकरेंनी गाडीतून खाली उतरून घेतली भेट ,स्वागतासाठी थांबले होते मनसैनिक!