राम मंदिराचं स्वप्न पूर्ण झालं, तब्बल 32 वर्षांनी त्यांनी पायात चपला घातल्या
राम मंदिरात पाचशे वर्षांनंतर रामलल्ला विराजमान झाले आहेत. राम मंदिराच्या आंदोलनासाठी लाखो कारसेवकांनी आंदोलन केले होते. अनेकांचे आंदोलनात प्राण गेले. अनेकांनी लाठी हल्ला सहन केला, अनेकांना तुरुंगवास झाला. जळगावातील कारसेवकाने राम मंदिर जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत अनवाणी राहणार पायात चपला घालणार नाही असा संकल्प केला होता.
जळगाव | 22 जानेवारी 2024 : राम मंदिराच्या उभारणीसाठी एक पिढी खपली आहे. या पिढीने राम मंदिराच्या उभारणीसाठी आंदोलनं केली. काही कारसेवकांनी लाठ्या काठ्या खाल्ल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत अयोध्येत रामलल्ला मंदिरात अखेर विराजमान झाले. अखेर पाचशे वर्षांच्या विलंबाने का राम मंदिराचे एका पिढीचे स्वप्न पूर्ण झाले. परंतू जळगावातील एका कार सेवकाची अनोखी कहानी समोर आली आहे. राम मंदिराचं स्वप्न उराशी बाळगून या कारसेवकानं जोपर्यंत अयोध्येत राम मंदिर होणार नाही तोपर्यंत पायात चपला घालणार नाही अशी शपथ घेतली होती. अखेर 32 वर्षांनी 60 वर्षीय कारसेवक विलास भावसार यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थित चपला घालण्यात आल्या.
जळगावातील रहिवासी विलास भावसार या कारसेवकाने राम मंदिर आंदोलनासाठी कारसेवक सहभाग घेतला होता. त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत 1992 च्या कारसेवत सहभाग घेतला होता. त्यांनी अयोध्येत जयश्री रामाचा जयघोष करीत आंदोलन केले होते. त्यांनी राम मंदिर होत नाही तोपर्यंत पायात चपला घालणार नाही असा संकल्प केला होता. पाचशे वर्षांचा वनवास सहन करीत रामलल्ला अखेर त्यांच्या मंदिरात विराजमान झाले आहेत. आज 32 वर्षांनी कारसेवकाचे राम मंदिर उभारण्याचे स्वप्न पूर्ण झाल्याने त्यांना समाधान वाटत आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी जामनेर येथे भावसार यांना सपत्नीक बोलावून त्यांचा सत्कार करीत त्यांना चपला घातल्या. तेव्हा भावसार यांनी गिरीश महाजन यांनी आंदोलनात खणखणीत आवाजात घोषणा देत आपले नेतृत्व केल्याची आठवण सांगितली.
मुला-मुलींच्या लग्नातही अनवाणी राहीले
जळगावातील कारसेवक विलास भावसार यांनी अयोध्या येथील राम मंदिराचे स्वप्न पूर्ण झाल्यानंतर तब्बल 32 वर्षांनंतर चप्पल घातली आहे.मंत्री गिरीश महाजन यांनी सन्मानपूर्वक कारसेवक विलास भावसार यांना पादत्राणे घातली. भावसार यांच्या पत्नीने आपल्या मुला-मुलींच्या लग्नात त्यांना चपला घालण्याची विनवणी करण्यात आली होती. तरीही त्यांनी कोणाचेही ऐकले नाही. आणि आज अखेर त्यांनी राम मंदिराचे स्वप्न पूर्ण झाल्याने चपला घातल्या.