एकीकडे कोरोनाग्रस्तांमध्ये वाढ, दुसरीकडे नियमांची पायमल्ली; जळगावात मनपाकडून डी मार्टला टाळे
जळगाव शहरातील 'डी मार्ट' मध्ये कोरोना नियमांची पायमल्ली झाल्यामुळे थेट टाळे ठोकण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला. (jalgaon municipal corporation dmart corona law)
जळगाव : राज्यातील सर्वच शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona) वाढत आहे. जळगाव (Jalgaon municipal corporation) शहरातसुद्धा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. राज्य सरकारकडून कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळण्याचे आवाहन केले जातेय. मात्र, या नियमांना धुडकावून लावले जात असल्याचं दिसतंय. जळगाव शहरातील डी मार्ट ( D mart) मध्ये कोरोना नियमांची पायमल्ली झाल्यामुळे थेट टाळे ठोकण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला. मनपाची आतापर्यंतची ही सर्वांत मोठी कारवाई आहे. तसेच नियमांचा भंग केल्यामुळे डी मार्ट प्रशासनाविरोधात कायदेशीर कारवाईसुद्धा करण्यात येणार आहे. (Jalgaon municipal corporation sealed D-mart due to breaking the corona law)
डी-मार्टमध्ये नियमांची पायमल्ली
जळगावमध्ये कोरोना रुग्णांमध्ये रोज वाढ होत आहे. जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा 59356 वर पोहोचला असून कोरोनामुळे येथे 1495 जणांचा मृत्यू झालाय. त्यामुळे कोरोना संसर्ग नव्याने वाढू लागल्यामुळे येथील प्रशासन दक्ष झाले आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव महापालिकेकडून विशेष मोहीम राबवली जातेय. यामध्ये नागरिकांना तसेच, हॉटेल्स, मॉल्स यांना कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र, काही ठिकाणी कोरोना नियमांची नीट अंमलबजावणी होत नसल्याचे मनापच्या अधिकाऱ्यांना दिसले. डी मार्टमध्येसुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. येथे 50 टक्क्यांपेक्षा अधिक ग्राहकांनी मास्क लावलेले नव्हते. तसेच डी मार्टच्या पार्किंगच्या आवारातदेखील ग्राहकांची तुफान गर्दी होती. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन मनपा प्रशासनाने डी मार्टविरोधात कडक कारवाई करण्याचे ठरवले. मनपाने या मॉलला थेट टाळे ठोकले आहे.
कायदेशीर कारवाई होणार
दरम्यान, डी मार्ट व्यवस्थापनाने नियमांचे पालन न केल्याने डी मार्टचे सर्व प्रवेशव्दार सील करण्यात आले. तसेच कोणत्याही उपाययोजना न करणे, ग्राहकांकडे केलेले दुर्लक्ष, एकाच वेळी मार्टमध्ये शेकडोंच्या संख्येत असलेली ग्राहकांची गर्दी यामुळे डी मार्ट व्यवस्थापनाविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. तशी माहिती संतोष वाहुळे यांनी दिली. तसेच मनपाने निर्धारित केलेला दंडसुद्धा डी मार्ट व्यवस्थापनाकडून वसूल केला जाणार आहे. यानंतर डी मार्टला पुन्हा सुरु करायचे असेल तर याबाबतचा पुढील निर्णय मनपा प्रशासनच घेणार आहे.
इतर बातम्या :
संजय राठोडांच्या शक्तिप्रदर्शनावर शरद पवार नाराज?
रायगडाच्या राजसदरेवरील बॅरिकेट्स हटवले, आता महाराजांच्या चरणापाशी नतमस्तक होता येणार
(Jalgaon municipal corporation sealed D-mart due to breaking the corona law)