AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जळगाव अपघातातील 15 मृत मजुरांच्या नातेवाईकांना ठाकरे सरकारकडून दोन लाखांची मदत

मृत मजूर हे रावेर तालुक्यातील रहिवाशी असल्याची माहिती प्रथमदर्शनी मिळत आहे. मृतांमध्ये सहा महिला व नऊ पुरूष आहेत. | Jalgaon truck accident

जळगाव अपघातातील 15 मृत मजुरांच्या नातेवाईकांना ठाकरे सरकारकडून  दोन लाखांची मदत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
| Updated on: Feb 15, 2021 | 2:57 PM
Share

मुंबई: जळगाव जिल्ह्यातील किनगाव (ता. यावल) येथे पपई घेऊन जाणाऱा टेम्पो पलटी होऊन झालेल्या अपघातात (Accident) 15 मजूर मृत्यूमुखी पडले. या मजुरांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून देण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. (Financial aid for Jalgaon truck accident victims)

मृत मजूर हे रावेर तालुक्यातील रहिवाशी असल्याची माहिती प्रथमदर्शनी मिळत आहे. मृतांमध्ये सहा महिला व नऊ पुरूष आहेत. हा अपघात दुर्देवी असल्याचे सांगताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मृत मजुरांच्या कुटुंबियाप्रती आपली सहवेदना व्यक्त केली आहे. याशिवाय अपघातात गंभीर आणि किरकोळ जखमी झालेल्या मजुरांवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी जळगाव जिल्हा प्रशासनाकडून घटनेची माहिती घेतली. तसेच संबंधित अपघातग्रस्तांना सर्व ती आवश्यक मदत करण्याचे निर्देश दिले. दरम्यान, पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनीही आभोडा गावाला सांत्वनपर भेट दिली. याठिकाणी त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.

पंतप्रधान मोदी हेलावले, मराठीतून श्रद्धांजली

जळगावात ट्रक उलटून 15 मजुरांचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले आहेत. या घटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदीही हेलावले आहेत. मराठीतून ट्विट करत पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातील जळगाव येथे हृदय हेलावून टाकणारा ट्रकचा अपघात घडला आहे. शोकाकुल कुटुंबांच्या दुःखात मी सहभागी आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले.

मयत मजुरांची नावं

1) शेख हुसेन शेख मुस्लिम मन्यार – वय 30 रा. फकीर वाडा रावेर 2) सरफराज कासम तडवी – वय 32 रा. केऱ्हाळा 3) नरेंद्र वामन वाघ – वय 25 रा. आभोडा 4) डिंगबर माधव सपकाळे – वय 55 रा. रावेर 5) दिलदार हुसेन तडवी – वय 20 रा. आभोडा 6) संदीप युवराज भालेराव – वय 25 रा. विवरा 7) अशोक जगन वाघ – वय 40 रा. आभोडा 8) दुर्गाबाई संदीप भालेराव – वय 20 रा. आभोडा 9) गणेश रमेश मोरे – वय 05 वर्ष रा. आभोडा 10) शारदा रमेश मोरे – वय 15 वर्ष रा. आभोडा 11) सागर अशोक वाघ – वय 03 वर्ष रा. आभोडा- 12) संगीता अशोक वाघ – वय 35 रा. आभोडा 13) सुमनबाई शालीक इंगळे – वय 45 रा. आभोडा 14) कमलाबाई रमेश मोरे – वय 45 रा. आभोडा 15) सबनुर हुसेन तडवी वय 53 रा. आभोडा

संबंधित बातम्या :

जळगावात पपयांचा ट्रक उलटून भीषण अपघात; 15 मजूर जागीच ठार

Financial aid for Jalgaon truck accident victims)

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.