जळगाव ट्रक अपघातात एकाच कुटुंबातील दहा जणांचा मृत्यू, आभोळा गावावर शोककळा

मजुरांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून देण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. (Jalgaon Truck accident kills family)

जळगाव ट्रक अपघातात एकाच कुटुंबातील दहा जणांचा मृत्यू, आभोळा गावावर शोककळा
जळगावातील ट्रक अपघातात १५ मजुरांचा मृत्यू
Follow us
| Updated on: Feb 15, 2021 | 3:16 PM

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्‍यात किनगावजवळ झालेल्या ट्रक अपघातात एकाच कुटुंबातील दहा जणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे रावेर तालुक्यामधील आभोळा गावावर शोककळा पसरली आहे. रविवारी मध्यरात्रीनंतर अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महार्गावर घडला. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या 15 मजुरांमध्ये सात पुरुष, सहा महिला आणि दोन बालकांचा समावेश आहे. (Jalgaon Truck accident kills family of ten)

पपई नेणारा ट्रक उलटला

रावेर तालुक्यातील अभोडा, केऱ्हाळा तसेच रावेर शहरातील काही मजूर धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील गावांमधून पपई ट्रकमध्ये भरण्याच्या कामासाठी गेलेले होते. ट्रकमध्ये पपई भरल्यानंतर ते रात्री पुन्हा रावेरला परत येत होते. किनगावजवळ चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला जाऊन उलटला.

ट्रकखाली दबून मजुरांचा मृत्यू

अपघातात काही मजूर ट्रकखाली तर काही मजूर पपईखाली दबले गेले. यामध्ये 15 मजुरांचा जागीच मृत्यू झाला. रात्रीची वेळ असल्याने लवकर मदतकार्य मिळू शकले नाही. त्यामुळे अनेक जखमींचा मृत्यू झाला. या अपघातात ठार झालेल्या मजुरांमध्ये सर्वाधिक पुरुष मजुरांचा समावेश आहे. सात पुरुष तर सहा महिलांचा आणि दोन बालकांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. ट्रकमध्ये एकूण 21 मजूर असल्याची माहिती समोर आली आहे.

मृतांच्या वारसांना सरकारकडून मदत

घटनेची माहिती मिळताच यावल पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या अपघातात ठार झालेल्या मजुरांमध्ये रावेर तालुक्यातील अभोडा, केऱ्हाळा तसेच रावेर शहरातील मजुरांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. या मजुरांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून देण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले.

मयत मजुरांची नावं
1) शेख हुसेन शेख मुस्लिम मन्यार – वय 30 रा. फकीर वाडा रावेर 2) सरफराज कासम तडवी – वय 32 रा. केऱ्हाळा 3) नरेंद्र वामन वाघ – वय 25 रा. आभोडा 4) डिंगबर माधव सपकाळे – वय 55 रा. रावेर 5) दिलदार हुसेन तडवी – वय 20 रा. आभोडा 6) संदीप युवराज भालेराव – वय 25 रा. विवरा 7) अशोक जगन वाघ – वय 40 रा. आभोडा 8) दुर्गाबाई संदीप भालेराव – वय 20 रा. आभोडा 9) गणेश रमेश मोरे – वय 05 वर्ष रा. आभोडा 10) शारदा रमेश मोरे – वय 15 वर्ष रा. आभोडा 11) सागर अशोक वाघ – वय 03 वर्ष रा. आभोडा- 12) संगीता अशोक वाघ – वय 35 रा. आभोडा 13) सुमनबाई शालीक इंगळे – वय 45 रा. आभोडा 14) कमलाबाई रमेश मोरे – वय 45 रा. आभोडा 15) सबनुर हुसेन तडवी वय 53 रा. आभोडा
(Jalgaon Truck accident kills family of ten)

पंतप्रधान शोकाकुल

महाराष्ट्रातील जळगाव येथे हृदय हेलावून टाकणारा ट्रकचा अपघात घडला आहे. शोकाकुल कुटुंबांच्या दुःखात मी सहभागी आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो, अशा शब्दात पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला आहे.

संबंधित बातम्या :

जळगावात ट्रक उलटून 15 मजुरांचा मृत्यू, पंतप्रधान मोदी हेलावले, मराठीतून श्रद्धांजली

जळगाव अपघातातील 15 मृत मजुरांच्या नातेवाईकांना ठाकरे सरकारकडून दोन लाखांची मदत

(Jalgaon Truck accident kills family of ten)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.