Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायक! घरात वाढदिवसाची धामधूम, ९ वर्षीय मुलीचा वाढदिवस ठरला शेवटचा दिवस

वैष्णवीनेही आपल्या ९ व्या वाढदिवासाचे प्लान्स तयार केले होते. घरात सर्वत्र धामधूम होती. वाढदिवसाचा कार्यक्रम साजरा करण्यासाठी ही धावपळ सुरू होती.

धक्कादायक! घरात वाढदिवसाची धामधूम, ९ वर्षीय मुलीचा वाढदिवस ठरला शेवटचा दिवस
Follow us
| Updated on: May 20, 2023 | 4:19 PM

प्रतिनिधी, जळगाव : उन्हाचे दिवस असल्याने बहुतेक सर्वांनी कुलर काढले. एसी प्रत्येकाला परवडत नाही. १० टक्के लोकांकडे एसी असेल. तर, ८० टक्के लोकांकडे कुलर आहे. बाकीचे पंख्यावर तर कुणी बिना पंख्याने दिवस काढणारेही लोकं आहेत. कुलरमध्ये आपण पाणी टाकतो. काही कुलर यामुळे करंट देतात. त्यामुळे कुलरपासून सावध असणे गरजेचे आहे. दरवर्षी उन्हाळा आला की, कुलरच्या शॉकने मृत्यूच्या बातम्या येतात. अशीच एक दुःखद घटना मुक्ताईनगरमध्ये घडली.

वैष्णवी या ९ वर्षीय मुलीचा शुक्रवारी वाढदिवस होता. वाढदिवसाची वाट मुलं आतुरतेने पाहत असतात. आपला वाढदिवस कसा साजरा करायचा याचे प्लान्स तयार केले जातात. वैष्णवीनेही आपल्या ९ व्या वाढदिवासाचे प्लान्स तयार केले होते. घरात सर्वत्र धामधूम होती. वाढदिवसाचा कार्यक्रम साजरा करण्यासाठी ही धावपळ सुरू होती.

घरात शोकाकूल वातावरण

पण, अशात एक धक्कादायक घटना समोर आली. वैष्णवी चुकून कुलरजवळ गेली. तिला कुलरचा शॉक बसला. यात तिचा मृत्यू झाला. यामुळे वाढदिवसाचा दिवस हाच वैष्णवीचा शेवटचा दिवस ठरला. घरात सर्वत्र शोकाकूल वातावरण झाले.

हे सुद्धा वाचा

कुलरचा शॉक बसला

मुक्ताईनगर येथील जिजाऊनगर प्रभाग क्रमांक १२ मधील घटना. वैष्णवीचा ९ वा वाढदिवस होता. सायंकाळी सर्व कुटुंबीय बालिकेचा वाढदिवस साजरा करण्याचे नियोजन करत होते. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास कुलरचा जबरजस्त शॉक बसला. यात वैष्णवीचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली.

वैष्णवीचा मृत्यू

मुक्ताईनगर शहरातील प्रभाग क्रमांक १२ मधील जिजाऊ नगरमध्ये ही घटना घडली. यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. वैष्णवी चेतन सनान्से असं मृतक मुलीचं नाव आहे. वैष्णवीचा शुक्रवारी कुलरचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे मुक्ताईनगर शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

वैष्णवी फक्त ९ वर्षांची होती. तिचे खेळण्याबागळण्याचे दिवस होते. उन्हाळा असल्याने सुट्या होत्या. मस्त मौजमस्ती करावी, असे तिला वाटत होते. पण, कुलरचा शॉक लागल्याने तिच्या आयुष्याची दोरी तुटली.

कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना.
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका.