Jalgaon News : आजीची प्रकृती खालावली म्हणून नातू पहायला आला, पण काकाच्या दारात येताच नातवाला हृदयविकाराचा झटका

आजारी पहायला भेटायला नातू काकाच्या घरी आला. पण काकाच्या दारात येताच नातू कोसळला अन् क्षणात सर्व संपलं. अखेर आजी-नातवाची शेवटची भेट झालीच नाही.

Jalgaon News : आजीची प्रकृती खालावली म्हणून नातू पहायला आला, पण काकाच्या दारात येताच नातवाला हृदयविकाराचा झटका
जळगावमध्ये आजी आणि नातवाची एकत्र अंत्ययात्राImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 27, 2023 | 10:32 AM

खेमचंद कुमावत, टीव्ही 9 मराठी, जळगाव / 27 जुलै 2023 : जळगावातील फैजपूर शहरात हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. आजी आजारी पडली म्हणून 24 वर्षीय नातू आजीला पहायला वडिलांसोबत काकाच्या घरी गेला. मात्र घरात प्रवेश करण्यापूर्वीच दारातच त्याला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला. नातवाच्या मृत्यूनंतर दोन तासांनी आजीचाही मृत्यू झाला. आजी आणि नातवाची एकत्रच अंत्ययात्रा निघाली अन् सर्वांना अश्रू अनावर झाले. कमलाबाई कोंडू मोरे आणि वैभव विष्णु मोरे अशी मयत आजी-नातवाची नावे आहेत. या घटनेमुळे मोरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तरुणाच्या मृत्यूमुळे फैजपूर शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

आजीची प्रकृती बिघडली म्हणून पहायला आला

फैजपूर शहरात मोरे कुटुंब वास्तव्यास आहेत. मयत कमलाबाई यांना दोन मुलं आहेत. मोठा मुलगा दत्तात्रय यांचे लक्कड पेठ परिसरात डी.के. मोरे ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. दत्तात्रय मोरे आई आणि आपल्या कुटुंबासह लक्कड पेठमध्ये वास्तव्यास आहेत. तर त्यांचा धाकटा भाऊ विष्णु मोरे आपल्या कुटुंबासह भारंबे वाड्यात राहतात. मंगळवारी पहाटे कमलाबाई यांची प्रकृती खालावली. यामुळे आपला विष्णु यांना आईच्या तब्येतीबाबत सांगितले.

दारात येताच हृदयविकाराचा झटका आला

आईची प्रकृती बिघडल्याचे कळताच विष्णु मोरे हे मुलगा वैभवसह भावाच्या घराकडे निघाले. मात्र काकाच्या दाराजवळ येताच वैभवला हृदयविकाराचा झटका आला आणि तो खाली कोसळला. कुटुंबीयांनी त्याला तात्काळ रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. नातवाच्या मृत्यूनंतर दोन तासांनी आजीनेही प्राण सोडले. यानंतर दुपारी आजी आणि नातवावर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

हे सुद्धा वाचा

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.