‘आपण हरामखोर लोकांना निवडून देतो’, भालचंद्र नेमाडे राजकीय नेत्यांवर संतापले

"चांगल्या लोकांनी राजकारणात पडूच नये हे असं झालंय. कुठला चांगलं माणूस धजेल यात? खोक्यांची भाषा चालते का? आपल्या सारख्याला शक्य नाही", असं भालचंद्र नेमाडे म्हणाले.

'आपण हरामखोर लोकांना निवडून देतो', भालचंद्र नेमाडे राजकीय नेत्यांवर संतापले
Follow us
| Updated on: Dec 13, 2022 | 10:52 PM

अनिल केऱ्हाळे, जळगाव : ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर संताप व्यक्त केलाय. त्यांनी सध्याच्या राजकारण्यांवर खालच्या शब्दांत टीका केलीय. “आपण हरामखोर लोकांना निवडून देतो. त्याचे हे फळं आहेत. आपल्याला कळत नाही का कोण चांगलं आहे ते?”, असा घणाघात भालचंद्र नेमाडे यांनी केलाय. जळगावातील जैन हिल्स येथे जैन समूहाच्या वतीने साहित्यिकांसाठी साहित्य कला पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

“चांगल्या लोकांनी राजकारणात पडूच नये हे असं झालंय. कुठला चांगलं माणूस धजेल यात? खोक्यांची भाषा चालते का? आपल्या सारख्याला शक्य नाही”, असं भालचंद्र नेमाडे म्हणाले.

“आपल्याला उद्याची काळजी असते. काय खावं काही नाही, अर्ध्या लोकांना अन्न मिळत नाही. हे सांगतात पण 60 टक्के लोकं अपुरे राहतात. त्यांना समतोल अन्न मिळत नाही. नीट सगळ्या गोष्टी मिळणं हे आपल्याकडे होत नाही’, असा दावा त्यांनी केला.

हे सुद्धा वाचा

“फार तर 10 ते 15 टक्के लोकांचं नीट चाललंय. अशा लोकांनी कुणाला निवडून द्यावं, हे तर कळलं पाहिजे. लोकशाहीचा काय उपयोग आहे ?”, असा प्रश्न नेमाडे यांनी उपस्थित केला.

“आपण कुणाला मत देतोय हे कळल्याशिवाय कसं सुधारणार आहे?”, असादेखील सवाल त्यांनी यावेळी केला.

Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.