Raksha Khadse | रक्षा खडसे यांचा निश्चय पक्का, पक्षासाठी सासऱ्यांच्या विरोधात लढणार

देशात पुढच्या वर्षी लोकसभेची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाच्या गोटात जबरदस्त हालचाली सुरु आहेत. प्रत्येक पक्षाकडून विविध मतदारसंघांसाठी उमेदवारांची चाचपणी सुरु आहे. या दरम्यान जळगावात रावेर मतदारसंघात आगामी काळात मोठा राजकीय ड्रामा बघायला मिळण्याची शक्यता आहे.

Raksha Khadse | रक्षा खडसे यांचा निश्चय पक्का, पक्षासाठी सासऱ्यांच्या विरोधात लढणार
Follow us
| Updated on: Sep 13, 2023 | 3:45 PM

जळगाव | 23 सप्टेंबर 2023 : जळगाव जिल्ह्यातील राजकारणात आगामी काळात राजकारणातील संघर्ष घरापर्यंत जाणार की काय? अशी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी रावेर लोकसभा मतदारसंघाबाबत मोठा दावा केला आहे. देशभरात पुढच्यावर्षी लोकसभेची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीत पक्षाने आदेश दिला तर आपण रावेर लोकसभेची जागा निवडू, असं सूचक वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केलं आहे. विशेष म्हणजे या जागेवर सध्या एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे या खासदार आहेत.

रक्षा खडसे या सध्या भाजपात आहेत. तर एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे आगामी काळात रावेरमध्ये दोघांनी लोकसभेची निवडणूक लढवली तर राजकीय रणांगणात सख्खे सासरे आणि सून आमनेसामने येऊ शकतात. दुसरीकडे रक्षा खडसे या रावेर लोकसभेसाठी निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. तसेच आपण या निवडणुकीत पुन्हा एकदा जिंकूनच येऊ, असा दावा त्यांनी केला आहे.

रक्षा खडसे नेमकं काय म्हणाल्या?

“रावेर लोकसभेचा इतिहास पाहिला तर सातत्याने या ठिकाणी भाजपचाच विजय होत आलाय. भविष्यातही ही जागा भाजपच जिंकणार आहे, असं म्हणत रक्षा खडसे यांनी रावेर लोकसभेच्या जागेवर आपला दावा कायम ठेवला आहे. रावेर लोकसभेच्या जागेसाठी पक्षाने मला संधी दिली तर मी संधीचं सोनं करेन”, असं रक्षा खडसे म्हणाल्या आहेत.

रक्षा खडसे यांची सासऱ्यांविरुद्ध निवडणूक लढण्याची तयारी

वेळ पडली तर आपण आपले सासरे एकनाथ खडसे यांच्यासमोर निवडणूक लढणार. निवडणुकीत कुठेही कमी पडणार नाही, असं म्हणत रक्षा खडसे यांनी एकनाथ खडसे यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. “इंडिया आघाडीने एकनाथ खडसेंना संधी दिली आणि पक्षाने मला संधी दिली तर त्या परिस्थितीला मी सामोरं जाणार”, असं रक्षा खडसे म्हणाल्या आहेत.

‘राष्ट्रवादीत जाणार नाही’

“रावेर लोकसभेची जागा ही भारतीय जनता पार्टीची आहे. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच निवडून येईल. राज्यातील जनता संभ्रमात आहे. एकनाथ खडसे राष्ट्रवादी गेले. त्यामुळे मी देखील राष्ट्रवादीत जाईल, अशी चर्चा महाराष्ट्रात चर्चा आहे. मात्र, मी राष्ट्रवादीत जाणार नाही. मी भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता म्हणून काम करते आणि मी भारतीय जनता पार्टीची शेवटपर्यंत राहीन. पक्षाने संधी दिली तर मी याच ठिकाणावरून निवडणूक लढणार. मी इतर पक्षात जाणार नाही”, असं रक्षा खडसे म्हणाल्या.

'पुतळ्याचे पैसे राणेंच्या निवडणुकीसाठी...', ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
'पुतळ्याचे पैसे राणेंच्या निवडणुकीसाठी...', ठाकरे गटातील नेत्याचा आरोप.
'संजय राऊत कपटी अन् रावणाच्या बुद्धिमत्तेचा माणूस', शहाजीबापूंची टीका
'संजय राऊत कपटी अन् रावणाच्या बुद्धिमत्तेचा माणूस', शहाजीबापूंची टीका.
अजित पवारांनी आपल्याच नेत्याला खडसावलं? पण कारण नेमकं काय?
अजित पवारांनी आपल्याच नेत्याला खडसावलं? पण कारण नेमकं काय?.
'अरे पठ्ठ्या लाडकी बहीण' योजना काय तुझ्या..'अजितदादांचा कोणावर निशाणा?
'अरे पठ्ठ्या लाडकी बहीण' योजना काय तुझ्या..'अजितदादांचा कोणावर निशाणा?.
'दम नाही बुआ, नमस्कार'.... अजित पवार मिश्किलपणे नेमकं काय म्हणाले?
'दम नाही बुआ, नमस्कार'.... अजित पवार मिश्किलपणे नेमकं काय म्हणाले?.
'लाडक्या बहिणीची दादांनी दखल घेतली नाही', महिला अजित पवारांवर भडकली
'लाडक्या बहिणीची दादांनी दखल घेतली नाही', महिला अजित पवारांवर भडकली.
'संजय राऊत हे मानसिक रोगी, ते वेड्यासारखं...', भाजप आमदारांचा हल्लाबोल
'संजय राऊत हे मानसिक रोगी, ते वेड्यासारखं...', भाजप आमदारांचा हल्लाबोल.
'तर महागात पडेल हे विसरू नका', राज ठाकरेंचा पाक चित्रपटावरून थेट इशारा
'तर महागात पडेल हे विसरू नका', राज ठाकरेंचा पाक चित्रपटावरून थेट इशारा.
तिरूपती मंदिरात हिंदू नाही तर ख्रिश्चन चेअरमन, कोणी गेला गंभीर आरोप?
तिरूपती मंदिरात हिंदू नाही तर ख्रिश्चन चेअरमन, कोणी गेला गंभीर आरोप?.
तर नाच्यासारखा थयथयाट केला असता, जरांगेंचा छगन भुजबळांवर निशाणा
तर नाच्यासारखा थयथयाट केला असता, जरांगेंचा छगन भुजबळांवर निशाणा.