‘काँग्रेसमध्ये एकाधिकारशाही’, निलंबनाच्या कारवाईनंतर उल्हास पाटील यांच्याकडून भूमिका स्पष्ट

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज पक्षात मोठी कारवाई केली आहे. त्यांनी पक्षाचे उपाध्यक्ष उल्हास पाटील यांना सहा वर्षांसाठी निलंबित केलं आहे. उल्हास पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी काँग्रेसमध्ये एकाधिकारशाही सुरु असल्याची टीका केली.

'काँग्रेसमध्ये एकाधिकारशाही', निलंबनाच्या कारवाईनंतर उल्हास पाटील यांच्याकडून भूमिका स्पष्ट
Follow us
| Updated on: Jan 22, 2024 | 9:25 PM

किशोर पाटील, Tv9 मराठी, जळगाव | 22 जानेवारी 2024 : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज पक्षात मोठी कारवाई केली आहे. नाना पटोले यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांना 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबित केलं आहे. डॉ. उल्हास पाटील त्यांच्या पत्नी डॉक्टर वर्षा पाटील या दोघांसह काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्यावर काँग्रेस तर्फे निलंबनाची कारवाई करण्यात आली. काँग्रेसकडून करण्यात आलेल्या या कारवाईमुळे जळगावच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. उल्हास पाटील यांना निलंबित केल्यानंतर ते आता भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी निलंबित केल्यानंतर उल्हास पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर भूमिका स्पष्ट केली.

“काँग्रेसमध्ये एकाधिकारशाही दिसत आहे. याचमुळे काँग्रेस रसातळाला जात आहे”, असं उल्हास पाटील म्हणाले. कुठलीही विचारणा किंवा नोटीस न देता कारवाई केल्याबद्दल उल्हास पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. “मला आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास निलंबित केल्याचं पत्र मिळालं. मात्र कुठलाही विचार न करता थेट कारवाई केल्यामुळे आता त्यांना विचारायचं काय?”, असा प्रश्न उल्हास पाटील यांनी उपस्थित केला.

उल्हास पाटील भाजपात प्रवेश करणार?

यावेळी उल्हास पाटील यांना भाजपात प्रवेश करणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “कारवाई झाल्यामुळे आता दुसरा काहीतरी विचार करावा लागेल”, असं म्हणत पत्नी वर्षा पाटील यांनासोबत घेऊन कन्या केतकी पाटील सोबत बुधवारी मुंबईत भाजपमध्ये पक्षप्रवेशाचे संकेत दिले. दरम्यान, उल्हास पाटील यांची एका माध्यम प्रतिनिधीशी बोलतानाची ऑडिओ क्लिप Tv9 च्या हाती लागली आहे. त्यात बुधवारी मुंबईत भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार असल्याचे उल्हास पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

उल्हास पाटील नेमके कोण आहेत?

उल्हास पाटील हे खान्देशातील दबदबा असलेलेल नेते आहेत. ते जळगावच्या रावेर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आहेत. ते काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी यांच्या मर्जीतील नेत्यांपैकी एक असल्याचं मानलं जातं. त्यांनी जळगावात अभियांत्रिकी महाविद्यालय, सहकारी बँक, विधी महाविद्यालय, फॅशन डिझायनिंग कॉलेज सुरु केले. उल्हास पाटील हे 1998 मध्ये खासदार म्हणून निवडून आले होते. पण अवघ्या 13 महिन्यांनी सरकार कोसळलं होतं आणि लोकसभा बरखास्त झाली. त्यानंतर झालेल्या निवडणुकींमध्ये त्यांचा पराभव झाला. पण तरीही त्यांनी तेरा महिन्यांचा विरोधी पक्षाचा कालावधी मिळाल्यानंतरही त्यांनी जळगाव जिल्ह्यात खासगी वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करून आणले. त्यांनी काँग्रेस पक्षात अंतर्गत अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.

आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.