धक्कादायक! पुलाच्या अभावामुळे निवडणूक कर्मचाऱ्यांचा बैलगाडीने निवडणूक साहित्यासह जीवघेणा प्रवास
अमळनेर तालुक्यातील सात्री गावात पूल नसल्याने आणि बोरी नदीला पाणी असल्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांना मतदानाचे साहित्य बैलगाडीने नेण्याची वेळ आली. नदीला पाणी असल्याने एसटी किंवा पायी जाणे शक्य नाही. त्यामुळे असा अनोखा प्रवास निवडणूक कर्मचाऱ्यांना करावा लागला. गावकऱ्यांनाही स्वातंत्र्यापूर्व काळापासून याच समस्यांना सामोरे जावे लागते. या घटनेने पुलाच्या अभावाची गंभीर समस्या पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.
किशोर पाटील, टीव्ही 9 प्रतिनिधी, जळगाव : जळगावच्या अमळनेर तालुक्यातील सात्री गावाला बैलगाडी बसून नदीतून कर्मचारी मतदानाचं साहित्य घेऊन गेले. सात्री गावाला पूल नसल्याने आणि बोरी नदीला पाणी आले असल्याने निवडणूक कर्मचाऱ्यांना ईव्हीएमसह साहित्य बैलगाडीवर नेण्याची वेळ आली. बोरी नदीला पाणी आलेले असल्याने नदीतून एसटी जाणे शक्य नव्हते आणि साहित्य घेऊन कर्मचाऱ्यांना पायी जाणेही शक्य नव्हते. पूल नसल्यामुळे मतदानाचा साहित्य घेऊन कर्मचारी बैलगाडीत बसले, आणि बैलगाडीत बसून नदी पार करून मतदान केंद्रावर पोहोचले. अमळनेर मतदारसंघातील सात्री या गावाला स्वातंत्र्यपूर्व काळापासून पूल नसल्याने नदीतून जीवघेणा प्रवास करत गावकऱ्यांनाही करावा लागतो अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
अमळनेर तालुक्यातील सात्री गावाला पूल नसल्याने आणि बोरी नदीला पाणी आले असल्याने निवडणूक कर्मचारी आणि ईव्हीएमसह साहित्य बैलगाडीवर नेण्याची वेळ प्रशासनावर आली. अमळनेर मतदारसंघाचे मतदान केंद्र क्रमांक ७ हे तालुक्यातील सात्री येथे आहे. या गावाला स्वातंत्र्यपूर्व काळापासून पूल नाही. त्यामुळे ग्रामस्थांना पावसाळ्यात समस्यांना सामोरे जावे लागते. प्रशासनालाही त्याचा चांगलाच अनुभव आला. निवडणूकीचे साहित्य आणि कर्मचारी घेऊन बस निघाली. डांगरी गावाला आल्यावर कर्मचारी आणि साहित्य बस खाली उतरवण्यात आले.
बोरी नदीला पाणी आलेले असल्याने नदीतून एसटी जाणे शक्य नव्हते आणि साहित्य घेऊन कर्मचाऱ्यांना पायी जाणेही शक्य नव्हते. त्यामुळे सुनील बोरसे यांची बैलगाडी मागवण्यात आली. सर्व साहित्य आणि सर्व कर्मचाऱ्यांना बैलगाडीत बसवण्यात आले. अर्ध्या पाण्यात बैलगाडी आल्यावर वाळूत बैलगाडी फसली. बैलगाडी अडकली म्हणून पोलीस पाटील विनोद बोरसे, सरपंच महेंद्र बोरसे मदतीला धावले. बैलगाडी लोटली आणि पाण्याबाहेर काढली. तेथून कर्मचाऱ्यांना खाली उतरवून वाळूतून पायी केंद्रापर्यंत नेण्यात आले.