जळगावमध्ये 14 तलवारींसह चार आरोपी जेरबंद, एक फरार; चोपडा ग्रामीण पोलिसांची कारवाई
ओमनी कारमधून काही इसम छुप्या पद्धतीने तलवारी घेऊन जात असल्याची माहिती खबऱ्याकडून पोलिसांना मिळाली होती. चोपडा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले यांना ही माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी भडगाव चाळीसगाव रोडवर सापळा लावला.
जळगाव : राजस्थानातील अजमेर येथून भडगाव चाळीसगावकडे जात असलेल्या वाहनातून 14 तलवारी चोपडा ग्रामीण पोलिसांनी आज जप्त केल्या आहेत. याप्रकरणी चार आरोपींना अटक केली असून एक आरोपी फरार आहे. या तलवारी नेमक्या कशासाठी आणण्यात आल्या होत्या, याबाबत चोपडा पोलिस अधिक तपास करीत आहेत.
गुप्त माहितीच्या आधारे कारवाई
ओमनी कारमधून काही इसम छुप्या पद्धतीने तलवारी घेऊन जात असल्याची माहिती खबऱ्याकडून पोलिसांना मिळाली होती. चोपडा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले यांना ही माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी भडगाव चाळीसगाव रोडवर सापळा लावला. यावेळी या मार्गावर येणाऱ्या या ओमनी कारची पोलिसांनी झडती घेतली. यावेळी गाडीच्या मागील सीट कव्हर व गाडीच्या पत्र्याच्या मधल्या गॅपमध्ये 14 तलवारी लपवल्याचे निदर्शनास आले. या तलवारी चोपडा ग्रामीण पोलिसांनी जप्त केल्या आहेत. घटनास्थळी चार जणांना ताब्यात घेतले असून एक आरोपी पसार होण्यात यशस्वी झाला आहे.
घातपाताच्या शक्यतेची पोलिसांकडून चाचपणी
सहाय्यक पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले(चोपडा उपविभाग), चोपडा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक देविदास कुंनगर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. वाहनाची झाडाझडती घेतली असता नेमक्या कोणत्या उद्देशाने या तलवारी आणल्या आहेत हे अजून उघडकीस आलेले नाही. या अनुषंगाने पोलीस अधिक तपास करीत आहेत. सदर तलवारी ह्या शोसाठीच्या नसल्याचे सहाय्यक पोलिस अधिक्षक कृषिकेष रावले यांनी सांगितले. या तलवारी स्वतंत्र बनावटीच्या असून या तलवारीचा वापर करून घातपात करण्याचा डाव असू शकतो. या शक्यतेची चाचपणी केली जात आहे. पुढील तपासात याबाबत निष्पन्न होईल, असे रावले यांनी नमूद केले.
चौघा आरोपींना अटक; साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त
या प्रकरणात पोलीस नाईक राकेश तानकू पाटील यांच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये मुस्ताकीन खान (रा. आस्थानगर,चाळीसगाव), आरिफ इब्राहिम पिंजारी (रा. घाटरोड, चाळीसगाव), मेहबूब खान हरीम खान जमिल खान (रा. घाटरोड चाळीसगाव), सलमान खान अय्यूब खान (इस्लामपूरा, चाळीसगाव) यांच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायदा आणि मुंबई पोलीस अधिनियमचे उल्लंघन केल्याच्या आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींकडून 14 तलवारींसह चार मोबाईल आणि साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईबद्दल पोलीस पथकाचे कौतुक केले जात आहे. (Four accused arrested with 14 swords in Jalgaon, Chopda rural police action)
इतर बातम्या
धक्कादायक! पोलिसाकडून विवाहितेवर 6 वर्षांपासून बलात्कार, पती व मुलाला जीवे मारण्याची धमकी
तामिळनाडूतील तंजावरमध्ये सापडले 500 कोटींचे शिवलिंग, पोलिसांनी केले जप्त