Girish Mahajan : तर पक्षातून हकालपट्टी करू, गिरीश महाजन यांनी काढली पदाधिकाऱ्यांची खरडपट्टी

Lok Sabha Election 2024 Result : लोकसभा निकालानंतर महाराष्ट्रात महायुतीत चिंतन, मंथन सुरु झाले आहे. भाजपचे काही आमदार अजित पवार गटावर नाराज आहेत तर भाजपच्या वरिष्ठांनी मतदारसंघातील कार्यकर्त्यांचे कान पिळले आहेत.

Girish Mahajan : तर पक्षातून हकालपट्टी करू, गिरीश महाजन यांनी काढली पदाधिकाऱ्यांची खरडपट्टी
गिरीश महाजन
Follow us
| Updated on: Jun 18, 2024 | 9:31 AM

लोकसभा निकालानंतर राज्यात महायुतीमध्ये महामंथन सुरु आहे. हा पराभव जिव्हारी लागणार होता. केंद्रासह राज्यात सत्ता स्थानी असतानाही जनादेश मिळविताना कोणती अडचण आली, कुठे कमी पडलो, जनता जर्नादनाचा आशीर्वाद का मिळाला नाही, याविषयीची समीक्षा सुरु आहे. भाजपचे काही आमदार अजित पवार गटावर नाराज असल्याचे समोर आले आहे. तर अनेक भाजप नेत्यांनी त्यांच्या मतदार संघात कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची कान उघडणी केली आहे. या पराभवाची जबाबदारी निश्चित करण्यात येत आहे. आता बुथनिहाय कामगिरी तपासल्यानंतर पक्षातंर्गत अनेकांची खरडपट्टी काढण्यात आली आहे.

गिरीश महाजन यांनी घेतली शाळा

लोकसभा निवडणुकीत पाहिजे त्या प्रमाणात मताधिक्य न मिळाल्याने त्याची समीक्षा करण्यात आली. जळगावमध्ये भाजपच्या कार्यालयात मंत्री गिरीश महाजन यांनी पदाधिकारी, कार्यकर्ते यांची शाळा भरवली. जळगावातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांना मंत्री गिरीश महाजन यांनी बंदद्वार घेतलेल्या बैठकीत खडे बोल सुनावले. जळगाव लोकसभेतील उमेदवारांना पाहिजे तसं मताधिक्य न मिळाल्याने मंत्री गिरीश महाजन यांची पदाधिकारी कार्यकर्त्यांवर नाराज आहेत. त्यांनी त्यांची नाराजी पदाधिकाऱ्यांसमोर व्यक्त केल्याची माहिती समोर येत आहे.

हे सुद्धा वाचा

इतक्या मतांची होती अपेक्षा

जळगाव लोकसभेच्या स्मिता वाघ यांना एकूण 3 ते साडे तीन लाख एवढे मताधिक्य मिळेल अशी मंत्री गिरीश महाजन यांची अपेक्षा होती.जळगाव शहरातूनही त्या त्या बुथवर पाहिजे त्या प्रमाणात मताधिक्य मिळाले नाही. काही भागात हक्काचा मतदार होता, तिथे पण मतांचा टक्का न वाढल्याने मंत्री गिरीश महाजन यांनी नगरसेवकांसह भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे कान टोचले.

पुन्हा चूक झाल्यास पक्षातून हकालपट्टी

मताधिक्यामध्ये आणखी वाढ झाली असती मात्र अनेकांनी मनापासून काम न केल्याने मंत्री गिरीश महाजन यांनी भाजप पदाधिकाऱ्यांची कान उघडणी केली. जळगाव शहरातील जी एम. फाउंडेशन या संपर्क कार्यालयात मंत्री गिरीश महाजन यांनी तब्बल एक तास बंद दारा आड बैठक घेतली. यामध्ये त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना फैलावर घेतल्याची माहिती समोर आली आहे. आगामी निवडणुकांमध्ये अशा पद्धतीने चूक पुन्हा केल्यास पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्याचा मंत्री गिरीश महाजन यांनी या बंद द्वार बैठकीत पदाधिकाऱ्यांना इशारा दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Non Stop LIVE Update
...तर महाराष्ट्रात पुन्हा राष्ट्रपती राजवट? सत्तेसाठी फक्त 48 तास अन्
...तर महाराष्ट्रात पुन्हा राष्ट्रपती राजवट? सत्तेसाठी फक्त 48 तास अन्.
लाडक्या बहिणीनी कोणाला निवडल? जुन्या भावांना की नवा वायदा करणाऱ्यांना?
लाडक्या बहिणीनी कोणाला निवडल? जुन्या भावांना की नवा वायदा करणाऱ्यांना?.
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा.
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?.
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?.
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'.
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?.
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.