जी शिवसेना काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसली ती शोभते का?; गुलाबराव पाटील यांचा निशाणा

विरोधकांचं काम टीका करणं हे आहे. परंतु, शेतकऱ्यांच्या बाबतीत एनडीआरएफचे नार्म डबल करण्याचं काम आमच्या शिंदे-फडणवीस सरकारनं केलं आहे.

जी शिवसेना काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसली ती शोभते का?; गुलाबराव पाटील यांचा निशाणा
Follow us
| Updated on: Apr 03, 2023 | 10:12 AM

जळगाव : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल महाविकास आघाडीच्या सभेत भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली. शिंदे गटाने बाप चोरी केला, असा घणाघात ठाकरे यांनी केला. या सभेत विधान सभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचीही उपस्थिती होती. काँग्रेसही त्यांच्या सोबतीला होते. हे तिघे महाविकास आघाडीचे घटकपक्ष एकत्र आल्याने आमच्यावर टीका करणे साहजिक असल्याचं मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.

टीका करणे विरोधकांचे काम

शेतकरी, बेरोजगारांचे प्रश्न आहेत. पण, बेरोजगारांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम हे सरकार करत असल्याची टीका या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली. यावर बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, विरोधकांचं काम टीका करणं हे आहे. परंतु, शेतकऱ्यांच्या बाबतीत एनडीआरएफचे नार्म डबल करण्याचं काम आमच्या शिंदे-फडणवीस सरकारनं केलं आहे.

हे सुद्धा वाचा

शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे कोण राहिले?

५० हजार रुपयांचं अनुदान ठाकरे सरकारने जाहीर केलं होतं. पण, त्यांनी ते पैसे दिले नाही. तेसुद्धा आम्ही शेतकऱ्यांना दिले. त्यांची उधारी आम्ही फेडली. शेतकऱ्यांच्या मागे आम्ही उभे राहिलो आहोत. सहाजिक आहे. सभा आहे. अमर, अकबर, अँथोनी एकत्र आले आहेत. त्यामुळे टीका करणे हे त्यांचं कामचं आहे, असंही गुलाबराव पाटील म्हणाले.

या नावांना आमच्या सरकारने मान्यता दिली

सरकारवर टीका केली नाही. तर त्यांच्या सभेला महत्त्व राहणार नाही. वीर सावरकर यांच्या नावाने यात्रा काढतात. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान झाला तेव्हा कुठं होते, असा आरोप राज्य सरकारवर महाविकास आघाडीकडून लावण्यात आला. यावर बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाला आमच्या सरकारने मान्यता दिली. संभाजीराजे यांच्या नावालासुद्धा आमच्या सरकारने मान्यता दिली.

ते त्यांना शोभते का?

बोलण्याचा भात आणि बोलण्याची कडी आता कुणी करू नये.शिवसेना ही काँग्रेसच्या मांडीला जाऊन बसली आहे. ते सोभते का, असा सवाल गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला.

सभेनिमित्त अमर अकबर अँथनी एकत्र आलेत. आमच्यावर टीका केली नाही तर त्यांच्या सभेला अर्थ राहणार नाही, अशी टीका मंत्री गुलाबराव पाटील यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर केली आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला आमच्या सरकारने मान्यता दिली.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.