Gold Silver Rate Today : सुवर्णनगरीत सोने चमकले, चांदी तळपली, ग्राहकांच्या तोंडचे पळाले पाणी

देशाची सुवर्णनगरी म्हणून परिचित असलेल्या जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दराने ग्राहकांचा घामटा फोडला. चांदीच्या किंमती पण गगनाला भिडल्याने अनेक ग्राहकांनी बाजारातून काढता पाय घेतला. जागतिक घडामोडी आणि लोकसभा निवडणुकीमुळे भावाने नवीन रेकॉर्ड केला आहे.

Gold Silver Rate Today : सुवर्णनगरीत सोने चमकले, चांदी तळपली, ग्राहकांच्या तोंडचे पळाले पाणी
सुवर्णनगरी सोने सूसाट, चांदी पण वधारली
Follow us
| Updated on: Apr 04, 2024 | 10:38 AM

देशातील सुवर्णपेठ जळगावच्या सराफा बाजारात सोने आणि चांदीने कमाल दरवाढ नोंदवली. सध्या जागतिक आणि देशातही मौल्यवान धातूंनी कहर केला आहे. ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. या दरवाढीमुळे सराफा बाजारात खरेदीसाठी गेलेला ग्राहक हिरमसून बाहेर पडत आहे. काही जण तर किंमती ऐकूनच खरेदीचा बेत रद्द करत आहे. तर लग्नसराईत खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना नाईलाजाने मौल्यवान धातूची खरेदी करावी लागत आहे. गेल्या ९ मार्च रोजी जळगावच्या सराफा बाजारात जीएसटीसह सोन्याचे दर ६७ हजार ५०० रुपयांवर पोहचले होते. आता त्यात चार हजार रुपयांची दरवाढ झाली आहे.

सोने ७१ हजारांच्या घरात

देशातील सुवर्ण नगरी म्हणून ओळख असलेल्या जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दराने 70 हजारांचा आकडा पार केला. ‘जीएसटी’ सह सोन्याचे दर प्रतितोळा ७१ हजार ४८२ रुपयांवर पोहचला आहे. यापूर्वी ९ मार्च रोजी सोने ६५ हजार ७०० रुपये प्रतितोळा झाले होते. तर जीएसटीसह सोन्याचे दर ६७ हजार ५०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचला होता. गेल्या अनेक दिवसांपासून सोने ६२ ते ६३ हजारांदरम्यान होते. पण आता सोन्याने मोठी झेप घेतली आहे.

हे सुद्धा वाचा

चांदी पण सूसाट

जळगाव येथील सराफा बाजारात चांदीच्या दरात पण मोठी वाढ झाली आहे चांदीचे दर ८० हजार ३४० रुपयापर्यंत पोहोचले आहेत. ६ मार्च रोजी ७२ हजार ८०० रुपये असलेल्या चांदीच्या दारातही दोनच दिवसात १२०० रुपये वाढ झाली. चांदीचे दर ७४ हजार रुपये प्रति किलोवर पोहोचले होते. ५ ते २९ मार्चदरम्यान २४ दिवसांत सोन्याच्या दरात ६ हजारांची, तर चांदीच्या दरात ३ हजारांची वाढ नोंदविण्यात आली आहे. लग्नसराई, लोकसभा निवडणुकीमुळे सोन्याच्या दरात वाढ झाल्याची माहिती सराफ व्यावसायिकांनी दिली.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोन्यासह चांदीने मुसंडी मारली.24 कॅरेट सोने 69,364 रुपये, 23 कॅरेट 69,086 रुपये, 22 कॅरेट सोने 63,537 रुपये झाले.18 कॅरेट 52,023 रुपये, 14 कॅरेट सोने 40,578 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 77,594 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.