नागपूर टू दादर अकेला गुलाबराव फादर, गटबाजी करणाऱ्यांना खडसावलं, जळगावात चौफेर फटकेबाजी

जळगाव जिल्ह्यातील 12 कृषी उत्पन्न बाजारसमित्यांची निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आहे. राज्यात शिवसेनेतील बंडाळीमुळे राजकीय समीकरणं बदलली असल्याने मतदारांचा कौल नेमका कुठे आहे, हे तपासून पाहिलं जातंय.

नागपूर टू दादर अकेला गुलाबराव फादर, गटबाजी करणाऱ्यांना खडसावलं, जळगावात चौफेर फटकेबाजी
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 31, 2023 | 5:46 PM

अनिल केऱ्हाळे, जळगाव : शिंदे-भाजप युतीला पक्षांतर्गत विरोध करणाऱ्यांना मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी चांगलंच फटकारलंय. जळगाव (Jalgaon) कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या बैठकीत गुलाबराव पाटील यांनी कार्यकर्त्यांचा समाचार घेतलाय. आम्ही विकासासाठीच उठाव केलाय. ज्यांना नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व मान्य नसेल ते आम्हाला विरोध करतील. पण एक लक्षात घ्या.. नागपूर टू दादर अकेला गुलाबराव फादर, असा डायलॉग गुराबराव पाटील यांनी मारला. सोशल मीडियात गुलाबराव पाटील यांचं हे वक्तव्य चांगलंच चर्चेत आहे.

युतीला विरोध करणाऱ्यांना खडसावलं

जळगाव कृषी उत्पन्न बाजारसमितीची येत्या काही दिवसात निवडणूक आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे समर्थित शिवसेना आणि भाजप युती एकत्रितपणे लढणार असल्याचं सूतोवाच गुलाबराव पाटील यांनी केलं. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत गुलाबराव पाटील म्हणाले, ‘ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही भाजपबरोबर आलो आहोत. ज्यांना मोदीचे नेतृत्व मान्य नसेल ते आम्हाला विरोध करतील. छोट्या-मोठ्या निवडणुकीसाठी काहीजण राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसत असतील तर त्यांना धोका आहे, असं वक्तव्य गुलाबराव पाटलांनी केलंय. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत युतीला विरोध करणाऱ्या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना खडसावले आहे.

बाजार समितीच्या निवडणुका या युतीबरोबरच लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या भाषणादरम्यान गुलाबराव पाटलांनी नागपूर टू दादर अकेला गुलाबराव फादर असे म्हणत विकासासाठी आम्ही उठाव केल्याचं ठणकावून सांगितलं.

निवडणुकीत शिंदे-भाजप युती

जळगाव जिल्ह्यातील 12 कृषी उत्पन्न बाजारसमित्यांची निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आहे. राज्यात शिवसेनेतील बंडाळीमुळे राजकीय समीकरणं बदलली असल्याने मतदारांचा कौल नेमका कुठे आहे, हे तपासून पाहिलं जातंय. जिल्ह्यातील रावेर, जामनेर, चाळीसगान, चोपडा, भुसावळ, पारोळा इथल्या बाजारसमित्यांसाठी 28 एप्रिल रोजी तर जळगाव, बोडवड, अमळनेर, धरणगाव, यावल, पाचोरा या बाजारसमित्यांसाठी 30 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. धरणगाव आणि जळगाव बाजारसमित्यांकडे सर्वांचं लक्ष लागलंय. भाजपचे गिरीश महाजन, शिंदे गटाचे गुलाबराव पाटील, राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे आणि माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर या निमित्ताने एकमेकांसमोर आव्हान उभे करतील.

सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.